पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये मोठे युद्ध पेटले असून रात्रभर जोरदार लढाई सुरू होती. पाकिस्तानने काही दिवसांपूर्वीच मोठा हल्ला अफगाणिस्तानवर केला. या हल्ल्यानंतर अफगाणिस्तानने त्याचा बदल घेत थेट पाकिस्तान सैन्य चाैक्यांवर हल्ला केला आणि 15 चाैक्या आपल्या ताब्यात घेतल्या. 55 पाकिस्तान सैनिकांना ठार केले. यासोबतच पाकिस्तानच्या लष्कारचे एक लढाऊ विमान देखील पाडले. यानंतर पाकिस्तानने थेट काबूल, कंधार आणि पक्तियाममध्ये मोठा हवाई हल्ला केला. ज्यामध्ये 130 लोक ठार झाले. दोन्ही देशांमध्ये सध्या युद्धाची स्थिती आहे. स्थिती भयंकर असून ऐन रमजानमध्ये युद्ध पेटले. तालिबानच्या प्रवक्त्याने सांगितले की, भित्र्या पाकिस्तानी सैन्याने काबूल, कंधार आणि पक्तियामध्ये अनेक ठिकाणी बॉम्बहल्ला केला. देवाचे आभार की, कोणालाही इजा झाली नाही. पाकिस्तानने दावा केला की, आमच्या हवाई हल्ल्यात 130 अफगाणिस्तानचे नागरिक ठार झाले.
यासर्व गोष्टींकरिता पाकिस्तानने अफगाणिस्तानला जबाबदार धरले असून काहीही कारण नसताना या सर्व गोष्टींमध्ये पाकिस्तानने भारतालाही ओढले. पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी म्हटले की, अफगाणिस्तानमधून नाटो देशांचे सैन्य परत गेल्यानंतर एक आशा होती की, अफगाणिस्तानमध्ये शांती राहिल आणि तालिबान लोकांच्या हिताचे काही निर्णय होती.
मात्र, तालिबानने अफगाणिस्तानला भारताची कॉलोनी बनवले. त्यांनी जगभरातून दहशतवादी अफगाणिस्तानात गोळा केले आणि सध्या त्याची निर्यात केली जात आहे. ख्वाजा आसिफ पुढे आरोप करत म्हटले क, अफगाण सरकारने आपल्या लोकांना मानवधिकारांपासून दूर ठेवले. त्यांनी महिलांनीही अधिकारापासून दूर ठेवले, जे त्यांना इस्लाम देतो. पाकिस्तानने परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रत्येक प्रयत्न केला.
आता सध्या तालिबान भारताचे प्रॉक्सी बनले आहे. पाकिस्तानच्या सैन्याला टार्गेट केले जात असताना आमचे सैन्य त्यांना मोठे प्रतिउत्तर देत आहे. ख्वाजाने स्पष्ट केले की, आता जबरदस्त अॅक्शन होणार आहे. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील संबंध गेल्या काही महिन्यांपासून चांगले सुधारले आहेत. पाकिस्तान अफगाणिस्तान यांच्यातील जवळकता यामुळे पाकिस्तानचा जळफळाट उठला आहे.