जागतिक युद्धजन्य परिस्थिती, अस्थिरतेच्या संकटावर एबीपी समूहाचे चीफ एडिटर अतिदेब सरकार यांचे मार्मिक भाष्य
रोहित धामणस्कर February 27, 2026 01:43 PM

 Ideas of India Summit 2026 Atideb Sarkar: गेल्या वर्षभरात जगाने अनेक युद्ध पाहिली आहेत. सध्या अनेक ठिकाणी युद्धजन्य परिस्थिती आहे. या सगळ्यामुळे माणुसकीला एका कड्याच्या टोकावर आणून ठेवले आहे. यामुळे संपूर्ण मानवजातच काहीशी संघर्षात अडकल्याचे प्रतिपादन एबीपी समूहाचे चीफ एडिटर अतिदेब सरकार (Atideb Sarkar) यांनी केले. एबीपी समूहाच्या 'आयडियाज ऑफ इंडिया' परिषदेच्या (Ideas of India Summit 2026) उद्घाटनप्रसंगी बोलत होते. यावेळी अतिदेब सरकार यांनी जागतिक पटलावर बदलत असलेल्या परिस्थितीवर दृष्टीक्षेप टाकताना या सगळ्याचे सविस्तर विश्लेषण मांडले. अमेरिकेने टॅरिफ युद्ध सुरु केले आहे. भारतावर कर लादला आहे. व्हाइट हाऊसने शुल्क आकारून जागतिक व्यापारात व्यत्यय आणला. अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने तो निर्णय रद्द केला. भारताने युरोपियन युनियनसोबत मुक्त व्यापार कराराची वाटाघाटी पूर्ण केली. भारतातील शेतकरी संघटना अमेरिकेसोबतच्या कराराला विरोध करत आहेत. गाझामध्ये अजूनही संघर्ष सुरू आहे; व्हेनेझुएलामध्ये सत्तांतर झाले आहे. इराणमध्ये तणाव निर्माण झाले आहेत. आणि युक्रेनमधील युद्ध संपवण्यासाठी अनेक प्रयत्न झाले तरी अद्याप शांतता प्रस्थापित झालेली नाही, असे आतिदेब सरकार यांनी म्हटले.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.