नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी देशाची माफी मागावी, अरविंद केजरीवालांची मागणी, दिल्लीत निवडणूक घेण्याचं चॅलेंज
युवराज जाधव February 27, 2026 08:13 PM

नवी दिल्ली :  दिल्ली मद्य धोरण घोटाळ्यात निर्दोष ठरल्यानंतर आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी पत्रकार परिषद घेतली. या वेळी केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना चॅलेंज दिलं. दिल्लीत तुम्ही निवडणूक घ्या, भाजपच्या 10 पेक्षा अधिक जागा निवडून आल्यास राजीनामा देईन, असं केजरीवाल म्हणाले. पीएम मोदी आणि अमित शाह यांनी देशाची माफी मागावी, असं देखील केजरीवाल म्हणाले.

भाजप 10 जागा जिंकल्यास राजकारण सोडेन

अरविंद केजरीवाल म्हणाले कोर्टाचा निकाल ऐतिहासिक आहे. हे पूर्ण षडयंत्र नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी रचलं. त्यांनी पूर्ण देशाची माफी मागितली पाहिजे. दोघांनी मिळून षडयंत्र रचलं आणि आम आदमी पार्टीला संपवण्याचा प्रयत्न केला. दिल्लीत ते आम्हाला पराभूत करु शकत नव्हते, हे ते पाहत होते, दिल्लीची जनता आमच्यावर खुश आहे हे ते पाहत होते. जनतेला माहिती आहे केजरीवाल इमानदार आहेत. त्यामुळं त्यांनी केजरीवालच्या इमानदारीवर आघात करण्यास सांगितलं. 

अरविंद केजरीवाल म्हणाले आयुष्यात इमानदारी कमावली आहे. त्यांना त्यावर आघात करायचा होता. काही जण म्हणात की तुरुगांतून आल्यानंत केजरीवाल गप्प झाले, केजरीवाल गायब झाले. मी काही नेता नाही, मला जेव्हा कोणी बेईमान म्हणतं तेव्हा मला फरक पडतो. माझ्या कुटुंबावर जेव्हा बोललं जातं  तेव्हा फरक पडतो. यामुळं संपूर्ण देशासमोर निर्दोष होऊन येईन तेव्हा बोलेन, असं केजरीवाल म्हणाले. 

अरविंद केजरीवाल यांनी यावेळी मोदींवर टीका केली. आता अरविंद केजरीवाल विरद्ध लढण्याचा एक मार्ग राहिलाय तो म्हणजे केजरीवालची हत्या, याशिवाय केजरीवालांना तुम्ही थांबवू शकणार नाही. तुम्ही सर्व काही करुन पाहिलं, असं केजरीवाल म्हणाले. 

अरविंद केजरीवाल म्हणाले की आज दिल्लीत कुठंही गेलात तर रस्ते खराब आहेत, रुग्णालयात औषधं मिळत नाहीत. मोहल्ला क्लिनिक बंद केलेत, शाळांची स्थिती खराबआहे. प्रदूषण आणि यमुना नदीची स्थिती खराब आहे. दिल्लीतील परिस्थिती खराब झालीय.जर हिम्मत असेल तर दिल्लीत पुन्हा निवडणूक घ्या, 10 पेक्षा अधिक जागा भाजपनं जिंकल्या तर राजकारण सोडेन, असं अरविंद केजरीवाल म्हणाले. 

मद्य घोटाळ्यात निर्दोष ठरल्यावर केजरीवाल काय म्हणाले?

आम्ही नेहमी सांगायचो सत्याचा विजय होतो. आम्हाला भारतीय न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. ज्या न्यायमूर्तींनी आमच्यासोबत न्याय केला त्यांचे धन्यवाद... सत्याचा विजय झाला, मी नेहमी सांगायचो भगवान आमच्यासोबत आहे. मोदीजी आणि अमित शाह यांनी स्वतंत्र भारतातील सर्वात राजकीय षडयंत्र रचलं. आम आदमी पार्टीला संपवण्यासाठी पक्षाच्या सर्वात मोठ्या पाच नेत्यांना तुरुंगात टाकलं. विद्यमान मुख्यमंत्र्याला घरातून फरफटत नेऊन तुरुंगात टाकलं, सहा महिने तुरुंगात ठेवलं गेलं.जे भारताच्या इतिहासात कधी घडलं नाही,असं केजरीवाल अरविंद केजरीवाल म्हणाले.   

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.