Satej Patil on Sugar Factory Crisis: बाळासाहेब पाटील यांच्या काळात 50 टक्के साखर कारखाने बंद पडले असा इतिहास लिहू देऊ नका, असा खोचक टोला विधानपरिषदेतील काँग्रेसचे गटनेते सतेज पाटील यांनी सहकार मंत्री बाबासाहेब यांना लगावला. सतेज पाटील यांनी बाबासाहेब पाटील यांना त्यांनी दिलेल्या मुलाखतीचा संदर्भ दिला. त्या मुलाखतीत 50 टक्क्यांपेक्षा जास्त कारखाने सुरु होणे अवघड असल्याचे सहकार मंत्र्यांनी म्हटलं होतं. उत्तरादाखल बाबासाहेब पाटील यांच्याकडून साखर कारखानदारांची बैठक घेण्याचे आश्वासन दिलं आहे.
सतेज पाटील यांनी साखर कारखानदारीच्या समस्या मांडताना सांगितलं की, साखर कारखाना हा उद्योग ग्रामीण भागाला चालना देणारा उद्योग आहे. मागील दोन वर्षात सहावेळा FRP वाढली पण MSP एकदाही वाढली नाही. क्लेज लोनसाठी, आणि सिजन चालू होत असताना लोनदेता येईल का यावर देखील सरकार पाहावं, अशी मागणी त्यांनी केली. काही कारखान्यांना NCDC च्या माध्यमातून मदतीची गरज असताना मदत केली जात नाही, असा आरोप पाटील यांनी केला. या उद्योगासाठी सरकार काय करणार आहे? सरकार पातळीवर काय केलं जाणार? मुख्यमंत्री काय निर्णय घेणार आहेत? अशी विचारणा त्यांनी मंत्र्यांकडे केली.
उत्तरादाखल बोलताना बाबासाहेब पाटील म्हणाले की, एमएसपी एकदाही वाढलेली नाही कारखान्यांची अत्यंत दयनीय परिस्थिती आहे. हा विषय आपल्या अख्त्यारीत येत नाही, केंद्राच्या अखत्यारीत येत नाही. केंद्राच्या माध्यमातून आपण पाठपुरावा करत आहोत. पुढील वर्षात तर महाराष्ट्रातील 50 टक्के कारखाने सुरु होणार नाहीत. कारखानदारी धोक्यात आलेली आहे हे मान्य करावे लागेल. पश्चिम महाराष्ट्रात सर्वात लवकर कारखाने बंद झाले आहेत. कॅपॅसिटी वाढली आहे पण ऊस वाढलेला नाही, AI वापरावं लागेल असं सांगितलं असल्याचे ते म्हणाले.
त्यांनी सांगितले की, कारखान्यासंदर्भात आपण बैठक लावून मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊ, त्यानंतर शिष्टमंडळ घेऊन दिल्लीला जाऊन अमितभाई शहा यांना भेटूया असे सांगितलं. कारखानदारी ही आपल्याला मिळालेली मोठी देण आहे ती आपण जोपासली पाहिजे, सतेज पाटील यांनी बाबासाहेब पाटील यांच्याकडून कारखानदारांच्या अडचणी मान्य असल्याने म्हणत दूर न केल्यास 50 टक्के कारखाने बंद पडण्याची भीती व्यक्त केली
इतर महत्वाच्या बातम्या