SUNNY DEOL ON AFFAIR RUMOURS: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता सनी देओल याने त्यांच्या करिअरमध्ये अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम केलं. त्याच्या देशभक्तीपर सिनेमे प्रचंड हिट झाले. दरम्यान ९० च्या दशकामध्ये सनी देओल हा अभिनयासह त्यांच्या वयक्तिक आयुष्यामुळे सुद्धा चर्चेत असायचा. त्याचं अनेक अभिनेत्रीसोबत नाव जोडलं गेलं होतं.
बॉलिवूडमधील अनेक प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत त्यांच्या अफेअरच्या चर्चा रंगायच्या. त्यात डिंपल कपाडिया, अमृता सिंह, मीनाक्षी शेषाद्री, रवीना टंडन यांच्यासोबत त्यांचं अफेर असल्याचं बोललं जायचं. डिंपलसोबत त्यांचं नाव आजही जोडलं जातय.
परंतु सनी देओलने 1984 मध्ये पुजा देओलसोबत लग्न केलं. तेव्हा त्याच्या करिअरची सुरुवात होती. जेव्हा त्याचं लग्न झालं त्यावेळी त्याचा पहिला सिनेमा रिलीज झाला होता. लग्न झालेलं असतानाही सनी देओलचं अनेक अभिनेत्रींसोबत नाव जोडलं जायचं. दरम्यान या सगळ्या चर्चांवर पुजा देओल यांची काय प्रतिक्रिया होती? याबद्दल सनीने एका मुलाखतीत सांगितलं होतं.
View this post on InstagramA post shared by Instant Bollywood (@instantbollywood)
ITMB ला दिलेल्या मुलाखतीत बोलताना सनी म्हणालेला की, 'या सगळ्या गोष्टी सिनेसृष्टीत होत असतात. हा आमच्या कामाचा भाग आहे.' त्यानंतर सनीला या चर्चेचा पुजा देओलवर काय परिणाम होतो? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर बोलताना सनी म्हणाला की, 'मला माहिती नाही तिच्यापर्यंत या सगळ्या गोष्टी पोहचतात की नाही. परंतु या फक्त चर्चा आहेत. असं काही घडलेलं नाही.'
२ अभिनेत्रींसोबत अफेअर, रंगेहात पकडले गेले तरीही नाना पाटेकरांच्या पत्नीने का नाही दिला घटस्फोट?