प्रवीण शेट्टींचा सभापतीपदासाठी अर्ज
esakal March 01, 2026 03:45 PM

प्रवीण शेट्टींचा सभापतिपदासाठी अर्ज
विरार (बातमीदार) ः वसई-विरार पालिकेच्या स्थायी समिती सभापतिपदाची निवडणूक गुरुवारी (ता. ५) होत आहे. याच अनुषंगाने बहुजन विकास आघाडीतर्फे माजी महापौर प्रवीण शेट्टी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या वेळी महापौर अजीव पाटील, उपमहापौर मार्शल लोपिस, सभागृह नेता प्रफुल्ल साने उपस्थित होते. वसई-विरार महापालिकेत बहुजन विकास आघाडीची सत्ता आहे. तर स्थायी समितीत १६ पैकी १० नगरसेवक बहुजन विकास आघाडीचे असल्याने स्थायी समिती सभापतिपद बहुजन विकास आघाडीकडेच राहण्याचे संकेत आहेत.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.