कश्मीरमध्ये फिरायला जाण्यासाठी नीना गुप्ता यांनी केलेलं लग्न, 'या' कारणामुळे मोडलं Delhi IITमध्ये शिकणाऱ्या मुलासोबतचं नातं!
esakal March 01, 2026 05:45 PM

NEENA GUPTA’S HIDDEN LOVE STORY: बॉलिवूडमधील नेहमीच चर्चेत असलेल्या अभिनेत्री नीना गुप्ता यांची त्यांच्या वक्तव्यामुळे आणि फॅशनमुळे बरीच चर्चा रंगताना पहायला मिळते. हिंदी सिनेसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी त्या एक आहेत. तसंच लोकप्रिय वेब सिरीज पंचायतमुळे सुद्धा त्यांची चर्चा रंगते. इतकं सगळं असूनही त्यांच्या वयक्तिक आयुष्याबद्दल अनेकदा बोललं जातं.

नीना गुप्ता आणि वेस्ट इंडिजचा क्रिकेटपटू विविनय रिचर्ड यांचं नातं जग जाहीर आहे. विविनय यांच्यापासून नीना गुप्ता यांना मसबा ही मुलगी सुद्धा आहे. नीना गुप्ता यांनी मसबाचा स्वत: एकटीने सांभाळ केलाय. परंतु विविनय यांच्यापूर्वीही नीना यांच्या आयुष्यात एक प्रेमकहाणी होती. परंतु ती फार कमी जणांना माहित आहे.

कॉलेजमध्ये असताना नीना गुप्ता यांनी दिल्ली आयआयटीमध्ये शिकणाऱ्या बंगाली तरुण अमलान याच्यावर प्रेम झालं होतं. दोघांनीही हे नातं सगळ्यांपासून लपून ठेवलं होतं. अमलान एका कामानिमित्त काश्मीरला जाणार होता. तेव्हा नीना यांनाही काश्मीरला जाण्याची इच्छा झाली. परंतु जेव्हा आईला समजलं तेव्हा तिने लग्न करुनच फिरायचं जायचं अशी अट घातली.

View this post on Instagram

A post shared by Neena Gupta (@neena_gupta)