ब्रिजमोहन पाटील, पीतांबर लोहार
पुणे : शहरातील प्रदूषण रोखण्यासाठी महापालिकेने आठ वर्षांत १६० कोटी रुपये खर्च केले असून, पुढे आणखी ११९ कोटी रुपये खर्च होणार आहेत. मात्र शहराच्या हवा प्रदूषणात किंचितही घट झालेली नाही.
विविध योजना आखल्या आणि त्यांची उद्घाटनेही केली. त्यासाठी कोट्यवधींच्या निधीचा चुराडाही करण्यात आला. मात्र तरीही महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या निकषांपेक्षा तब्बल ५५ टक्के जास्त प्रदूषण पुणेकरांच्या फुप्फुसात जात आहे.
सिवरेजवर प्रक्रिया न केल्यास गृहसंकुलांचे जोडणी खंडित करणारवाहनांमधून बाहेर पडणारा विषारी धूर, बेसुमार बांधकाम प्रकल्प, सिमेंट प्लांटमधून बाहेर पडणारे काँक्रिट, परिसरात पसरणारे धूलिकण या प्रदूषणामुळे पुणेकर त्रस्त झाले आहेत. त्याचा पुणेकरांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहे. याबाबतचे भयाण वास्तव ‘सकाळ’ने ‘गुदमरतोय श्वास’ या वृत्त मालिकेतून मांडले. प्रदूषणाला कारणीभूत ठरणाऱ्या विविध घटकांचा आढावा घेऊन पुण्यातील परिस्थिती मांडली.
काही प्रमाणात यशपुणे महापालिकेकडून हवा प्रदूषण कमी करण्यासाठी केलेल्या उपाययोजनांचा काही प्रमाणात फायदा झाला आहे. प्रदूषणाची सतत वाढत जाणारी पातळी ही स्थिर करण्यात यश मिळवले असले तरी ती मानकापेक्षा खूप जास्त आहे. त्यामुळे यावर आणखी काम करून पातळी खाली आणावी लागणार आहे.
....पण धोका कायमशहराच्या विविध भागांत सुरू असलेली बेसुमार बांधकामे, काँक्रीट प्लांटमुळे हवेत उडणारी धूळ, सिमेंट याचा मोठा फटका बसत आहे. त्याचप्रमाणे गाड्यांमधून बाहेर पडणारा धूर, कचरा जाळणे यातून प्रदूषण वाढत आहे. महापालिकेने आतापर्यंत केलेल्या उपाययोजना या प्रदूषणापुढे तोडक्या आहेत. यामुळे प्रदूषण कमी झाले वाटत असले तरी असूनही महापालिकेला ३३ मायक्रो ग्रॅम प्रति घनमीटर इतके प्रदूषण कमी करावे लागणार आहे.
५५ टक्के जास्तप्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मानकानुसार, पीएम १० धूलिकणांचे वार्षिक प्रमाण ६० मायक्रो ग्रॅम प्रतिघनमीटरपेक्षा कमी असायला हवे. पुण्यात २०२४-२५ मध्ये पीएम १० धूलिकणांचे वार्षिक प्रमाण ९३ मायक्रोग्रॅम प्रति घनमीटर इतके आहे. हे प्रमाण मानकापेक्षा ५५ टक्के जास्त आहे.
महापालिकेचे म्हणणे...पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पर्यावरण सद्यःस्थिती अहवालात नमूद आहे की, ‘‘शहराचे क्षेत्रफळ व लोकसंख्येचे प्रमाण व्यस्त आहे. त्यामुळे राहण्याच्या जागेचा अभाव, दिवसेंदिवस वाढणारी वाहनांची संख्या, अपुरी मलनिःसारण सुविधा, घनकचरा साठवण्याचा जागेचा प्रश्न व वाढणाऱ्या झोपडपट्ट्या यामुळे शहरातील वायू प्रदूषण गंभीर स्वरूप धारण करीत आहे. वाढत्या वाहतूक कोंडीमुळे शहरातील तरंगणारे धुलिकण (पीएम १०, पीएम २.५), नायट्रोजन ऑक्साइड यांचे प्रमाण वाढत आहे. विविध विकासकामे, बांधकाम व उद्योगधंदे यातून निर्माण होणारी धूळ हवेत पसरत असल्याने धुलिकणांच्या वाढीमुळे हवा प्रदूषित होत आहे.’’
‘ड्राय मिस्ट’ आधारित फाउंटन प्रणालीपिंपरी चिंचवडमधील आकुर्डी चौक, मोहननगर, चिंचवड विसर्जन घाट, होळकर चौक, कोकणे चौक, तळवडे चौक, मोशी गोदाम चौक, नाशिक फाटा, चिंचवडगाव, नेहरूनगर, धर्मराज चौक, ताथवडे बीआरटी रस्ता, पिंपळे निलख, निगडी प्राधिकरण, पिंपळे गुरव, केएसबी चौक, थरमॅक्स चौक, मॅगझीन चौक, चिखली आरटीओ चौक, भोंडवे कॉर्नर रावेत, मोरया चौक चिंचवड, जगताप डेअरी चौक, डांगे चौक अशा २१ ठिकाणी ‘ड्राय मिस्ट’ आधारित फाउंटन प्रणाली उभारली आहे. याद्वारे उच्चदाब पंप व विशेष नोझल वापरून धुके तयार करणे व हवेतील धुलिकण जड बनवून जमिनीवर आणले जाते. वातावरण थंड राहण्यास मदत होते.
Latest Marathi News Update: दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर... ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी....निवासी, व्यावसायिक, औद्योगिक व शांतता अशा चार क्षेत्रात पिंपरी-चिंचवड शहराचे विभाजन केले आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाने या भागांतील दिवस व रात्रीची ध्वनी पातळी निश्चित केली आहे. न्यायालये, रुग्णालये, शैक्षणिक संस्थांचा शंभर मीटर परिघ क्षेत्र शांतता क्षेत्र घोषित केले आहे. शहरातील ३४ ठिकाणी ध्वनी प्रदूषण मोजले आहे. त्यानुसार २०२४-२५ मध्ये काही भागात ध्वनी प्रदूषण पातळी मर्यादेपेक्षा अधिक असल्याचे आढळले आहे.