गोविंदगडावर स्वच्छता मोहीम
esakal March 01, 2026 03:45 PM

-rat२८p५.jpg-
२६O२७७६८
चिपळूण ः दुर्गसंवर्धन मोहिमेत सहभागी झालेले श्री स्वामी समर्थ परिवारातील सदस्य.
--------
गोविंदगडावर स्वच्छतामोहीम
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २८ ः अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक व बालविकास मार्ग दिडोंरी प्रणित संस्थेच्यावतीने आबासाहेब मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली गोवळकोट गोविंदगड येथे दुर्गसंवर्धन अभियान राबवले. या निमित्ताने गोविंदगडावर स्वच्छता उपक्रम राबवून जनजागृती करण्यात आली.
शहरातील श्रीराम मंदिर वाणी आळी स्वामी समर्थ सेवेकऱ्यांनी गोवळकोट गोविंदगडावर जाऊन स्वच्छतामोहीम राबवली. किल्ल्यावरील श्री देवी रेडजाईचा मानसन्मान केला. गडावरील माती कलशात भरून कलशाची विधीवत पूजा केली तसेच गडावरील ऐतिहासिक माहिती, पशु-पक्षी, औषधी वनस्पती आदींची माहिती घेण्यात आली. या अभियानात राजे सामाजिक प्रतिष्ठानचे विशाल राऊत व त्यांच्या सहकाऱ्यांचे मोलाचे सहकार्य मिळाले. या मोहिमेत ऐतिहासिक वारसा जतन करण्यासोबतच स्वच्छता, पर्यावरण संवर्धन होण्याचा हेतू असल्याची माहिती सेवक संजय पोकळे यांनी दिली.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.