Chhatrapati Sambhajinagar News: छत्रपती संभाजीनगरमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. अतिक्रमण कारवाईला विरोध करणाऱ्या विरोधीपक्ष नेत्यासह एमआयएमच्या14 नगरसेविक आणि नगरसेविकांच्या पतींवर गुन्हा (Chhatrapati Sambhajinagar Crime News) दाखल करण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगरच्या शहागंज भागात अतिक्रमण हटाव मोहिमेदरम्यान विरोधीपक्षनेते समीर साजेद बिल्डर यांनी एमआयएमच्या (MIM) नगरसेवकांसह कारवाईला विरोध केला होता. तसेच कारवाई करण्याऱ्या पथकाला पिटाळून लावले होते. त्यामुळे महानगरपालिकेच्या महिला उप-आयुक्त सविता सोनवणे यांच्या तक्रारीवरून सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी एमआयएमच्या नगरसेवकांच्या 14 नगरसेवकांसह 40 ते 50 जणांविरुद्ध सिटीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Chhatrapati Sambhajinagar Crime News: एमआयएम नगरसेवकांवर गंभीर आरोप
पथकातील अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केली, धमकी दिली आणि धक्काबुक्कीही केली. 'महानगरपालिका तुमच्या बापाची जहागीर नाही' अशा शब्दांत दमदाटी करून हातगाडी चालकांना पुन्हा अतिक्रमण करण्यासाठी भडकवले. तर कारवाईसाठी आलेले जेसीबी आणि ट्रक बळजबरीने तिथून हटवण्यास भाग पाडले आणि परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण केले. या सर्व कृत्याचे व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर शेअर केले, ज्यामुळे प्रशासकीय प्रतिमा मलीन केली. विकास कामास अडथळा केल्यास सदस्यत्व रद्द होवु शकते, अशी पुरेपुर माहीती असतानाही सर्व नगरसेवकांनी जाणीवपुर्वक बेकायदेशीर जमाव जमवुन सरकारी कामात अडथळा र्निमाण केला. असा गंभीर आरोप एमआयएम नगरसेवकांवर करण्यात आला आहे.
Chhatrapati Sambhajinagar Crime : मद्यधुंद तरुणांचा राडा; चक्क खिशातून बंदूक काढत हवेत गोळी झाडली
छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यातील थापटी तांडा येथे शनिवारी रात्री 11च्या सुमारास कुलस्वामिनी कला केंद्राबाहेर मद्यधुंद तरुणांनी चांगलाच धिंगाणा घातला. एका क्षुल्लक कारणावरून या मद्यधुंद लोकांनी रस्त्याने जाणाऱ्या रजापूरच्या एका तरुणाला गाठलं आणि त्याला बेदम मारहाण केली. पण हा राडा इथेच थांबला नाही. मारहाण करणाऱ्यांपैकी एकाने चक्क खिशातून बंदूक काढली आणि हवेत गोळी झाडली. गोळीबाराच्या या आवाजाने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली. ही बातमी वाऱ्यासारखी रजापूर गावात पोहोचली आणि तब्बल 300 गावकऱ्यांचा जमाव कला केंद्रावर चालून आला. संतापलेल्या या जमावाने कला केंद्राचा लोखंडी दरवाजा अक्षरशः तोडून टाकला आणि आतमध्ये राडा सुरू केला. केंद्रातील फर्निचर, सीसीटीव्ही कॅमेरे, टेबल आणि विजेची उपकरणं जमावाने फोडून काढली. एवढंच नाही, तर पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या 10 ते 12 गाड्यांच्या काचा फोडून लाखो रुपयांचं नुकसान केलं. या तुफान दगडफेकीत 3 ते 4 लोक जखमी झाले आहेत. ज्यावेळी हा हल्ला झाला, तेव्हा आतमध्ये डान्स बघण्यासाठी मोठी गर्दी होती. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे मोठी पळापळ झाली. घटनेची माहिती मिळताच पाचोड पोलिसांनी तातडीने धाव घेतली आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. सध्या रजापूर गावात तणावपूर्ण शांतता आहे.
इतर महत्वाच्या बातम्या