'छावा'साठी विक्की कौशलला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या पुरस्कार; संतोष जुवेकरकडून तोंडभरुन कौतुक, म्हणाला...
एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क March 03, 2026 12:43 PM

Vicky Kaushal Best Actor Zee Cine Awards 2026: फिल्म इंडस्ट्रीत (Film Industry) प्रतिष्ठेचा समजला जाणारा 'झी सिने अवॉर्ड्स 2026' नुकताच पार पडला. या सोहळ्यात बॉलिवूडच्या अनेक मान्यवरांनी हजेरी लावली होती. कोणता सिनेमा पुरस्कारावर आपलं नाव कोरणार? याची उत्सुकता सर्वांना लागलेली. 'छावा' (Chaava Movie), 'धुरंधर' (Dhurandhar Movie), 'तेरे इश्क में', 'केसरी 2' यापैकी कोणता सिनेमा बाजी मारणार याच्या चर्चा रंगलेल्या. या सोहळ्यात बॉलिवूड सुपरस्टार (Bollywood Actor) विक्की कौशल (Vicky Kaushal) याला 'छावा'मधील छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार देण्यात आला. पुरस्कार पटकावल्यानंतर विक्कीनं सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. 

विक्की कौशलनं पुरस्कार जिंकल्यानंतर 'झी सिने अवॉर्ड्स'चे आभार मानत एक पोस्ट केली आहे. तसेच, या पुरस्काराचं सर्व श्रेय 'छावा'च्या टीमला दिलं आहे. विक्की कौशलनं पोस्टमध्ये लिहिलंय की, "हा पुरस्कार केवळ माझा नाही, तर 'छावा'च्या संपूर्ण टीमचा आहे. दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर आणि निर्माते दिनेश विजान यांनी पहिल्या दिवसापासून माझ्यावर जो विश्वास दाखवला, त्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे... माझ्या चाहत्यांच्या प्रेमामुळेच हे शक्य झालंय आणि मी वचन देतो की, तुमच्या या प्रेमाला मी कधीच गृहीत धरणार नाही..." 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Vicky Kaushal (@vickykaushal09)

विक्की कौशलच्या पोस्टवर संतोष जुवेकरची कमेंट 

'छावा' सिनेमात विक्क कौशलनं छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारलेली. विक्कीच्या रुपात अवघ्या देशानं महाराजांना पाहिलं, अनुभवलं. यावेळी सिनेमात विक्की कौशलसोबत इतरही अनेक सेलिब्रिटी झळकलेले. यामध्ये अनेक मराठी कलाकारही होते. 'छावा'मध्ये विक्की कौशलसोबत मराठी अभिनेता संतोष जुवेकर झळकलेला.


'छावा' सिनेमासाठी विक्की कौशलला पुरस्कार मिळाल्यानंतर महत्त्वाच्या भूमिका साकारणाऱ्या सहकाऱ्याचं भरभरुन कौतुक केलं. संतोषनं विक्कीच्या पोस्टवर कमेंटकरुन विक्कीचं तोंडभरुन कौतुक केलं आहे. 'छावा' सिनेमात विकी कौशलसोबत झळकलेल्या संतोष जुवेकरनं विकीच्या पोस्टवर कमेंट केली आहे. संतोषनं कमेंटमध्ये म्हटलंय की, "पाजी, तुम्ही हे पूर्णपणे डिझर्व्ह करता... तुमचं खूप खूप अभिनंदन!"

Thalapathy Vijay Share Post After Wife Files Divorce: एकीकडे घटस्फोटाच्या चर्चा, दुसरीकडे थलपति विजयची पहिली पोस्ट, म्हणाला, 'जीत पक्की है...'

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.