Flights Cancelled : बंगळूरहून २२ आंतरराष्ट्रीय उड्डाणे रद्द, प्रवासी हैराण मध्यपूर्वेतील तणावाचा परिणाम, प्रवाशांची प्रचंड गैरसोय
esakal March 04, 2026 02:45 AM

बंगळूर : अमेरिका-इस्त्रायल आणि इराण यांच्यातील संघर्ष तीव्र झाल्यानंतर मध्यपूर्वेतील हवाई क्षेत्रात सुरक्षेचा गंभीर धोका निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर बंगळूर येथील केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून सुटणारी व येणारी सुमारे २२ आंतरराष्ट्रीय उड्डाणे तातडीने रद्द करण्यात आली आहेत.

मध्यपूर्वेतील प्रमुख व्यापारी व पर्यटन केंद्रे असलेल्या दुबई, अबू धाबी, दोहा आणि जेद्दाह या शहरांशी जोडणारी उड्डाणे रद्द झाली आहेत. युद्धाच्या भीतीमुळे संबंधित हवाई क्षेत्राचा वापर करण्यास विमान कंपन्या टाळाटाळ करत आहेत.

Pune Dubai Flights Suspended : इस्रायल-इराण युद्धाचा फटका ! पुणे-दुबई विमानसेवा सलग चौथ्या दिवशी बंद, प्रवाशांच्या अडचणीत वाढ

एअर इंडिया, एमिरेट्स, इंडिगो आणि कतर एअरवेज यांसारख्या प्रमुख विमान कंपन्यांनी आपली सेवा तात्पुरती स्थगित केली आहे किंवा काही उड्डाणे पर्यायी मार्गाने वळवली आहेत. संघर्षग्रस्त प्रदेशांवरून उड्डाण करणे धोकादायक ठरू शकते, या कारणास्तव हे निर्णय घेतले आहेत.

अचानक उड्डाणे रद्द झाल्याने बंगळूर विमानतळावर शेकडो प्रवासी अडचणीत सापडले. नोकरी, व्यवसाय किंवा तातडीच्या बंगळूर येथील केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण भरणारी आणि येथे उतरणारी २२ आंतरराष्ट्रीय उड्डाणे तातडीने रद्द करण्यात आली.

Flight Cancel: इस्रायल-इराण युद्धाचा फटका! पुणे-मुंबईहून परदेशी जाणारी विमाने रद्द; देशभरात विमानतळांवर प्रवासी अडकले

त्यामुळे विमानतळावरील प्रवासी हैराण झाले. कामानिमित्त परदेशात जाणाऱ्यांना विमानतळावरील काउंटरसमोर रांगा लावाव्या लागल्या. परदेशातून येणाऱ्या प्रवाशांच्या नातेवाईकांनाही प्रतीक्षा करावी लागत आहे.

प्रवाशांनी विमानतळावर जाण्यापूर्वी संबंधित विमान कंपनीच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा मोबाईल ॲपवर उड्डाणाची स्थिती तपासावी. तसेच कंपनीकडून येणारे विमान कंपन्यांचे प्रवाशांसाठी दोन पर्याय असे पुनर्नियोजन- अतिरिक्त शुल्क न आकारता (उपलब्धतेनुसार) प्रवासाची तारीख पुढे ढकलण्याची सुविधा.

पूर्ण परतावा - प्रवास रद्द करू इच्छिणाऱ्यांना संपूर्ण तिकीट रक्कम परत दिली जाईल किंवा ती रक्कम क्रेडिट शेलच्या स्वरूपात भविष्यातील प्रवासासाठी वापरता येईल. एसएमएस किंवा ई-मेल संदेश लक्षपूर्वक पाहावेत. तातडीच्या मदतीसाठी विमानतळाच्या हेल्पलाईनशी संपर्क साधावा.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.