उर्से गावाचा एकोप्याचा संदेश
esakal March 04, 2026 10:45 AM

उर्से गावाचा एकोप्याचा संदेश
‘एक गाव-एक होळी’ची ५० वर्षांची परंपरा
कासा, ता. ३ (बातमीदार)ः कासा परिसरासह ग्रामीण भागात होळी सणाची मोठी धूम सुरू आहे. बदलत्या काळात प्रथा-परंपरा लुप्त होत असताना उर्से गावात मात्र ५० वर्षांपासून ‘एक गाव-एक होळी’ उपक्रमातून सामूहिक पद्धतीने सण-उत्सव साजरे करण्याची परंपरा जपली आहे.
गणेशोत्सव इतर धार्मिक, सांस्कृतिक सण उर्से गावांमध्ये एकत्रितपणे साजरे केले जातात. पूर्वी कामानिमित्त मुंबई, गुजरात किंवा इतर भागात गेलेली मंडळी सणासाठी आवर्जून गावी येतात. आजही रोजगारानिमित्त बाहेरगावी असलेले ग्रामस्थ होळीच्या निमित्ताने गावी हजेरी लावतात. त्यामुळे सणाला कुटुंबीयांसह गावकऱ्यांचा सहभाग लाभतो. होळीसाठी उंचीचे झाड निवडले जाते. पारंपरिक पद्धतीने पूजा करून सजावट केली जाते. होळीसाठीचे बांबू किंवा झाड आणण्याचा पहिला मान गावच्या पाटलाला दिला जातो. विशेष म्हणजे, प्रत्येक घरातून एक लाकूड देण्याची प्रथा सुरू आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.