साईबाबा संस्थानचे माजी अध्यक्ष सुरेश हावरे यांनी त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून साई चरणी 6 सुवर्ण ‘ॐ’ अक्षर अर्पण केलेत.. 309 ग्रॅम वजनाच्या या सुवर्ण दानाची किंमत 46 लाख 9 हजार इतकी आहे.. आकर्षक नक्षीकाम असलेली ही ‘ॐ’ अक्षरे साईबाबांच्या मूर्तीमागील भिंतीवर बसवण्यात आली आहेत.. साईबाबा संस्थानच्या वतीने सुरेश हावरे यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आलाय..
मुंबई–अहमदाबाद महामार्गावर भीषण अपघात; टेम्पोला भीषण आगमुंबई–अहमदाबाद महामार्गावर भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. पालघर तालुक्यातील सोमट्याजवळ धावत्या टेम्पोला अचानक भीषण आग लागल्याने एकाच खळबळ उडाली. मध्यरात्री ही घटना गुजरात वाहिनीवर घडली असून, काही क्षणांतच आगीने रौद्ररूप धारण केले. आगीची तीव्रता इतकी होती की टेम्पो पूर्णपणे जळून खाक झाला. या भीषण आगीत चालकाचा जागीच मृत्यू झाला असून, तो टेम्पोमधील साहित्यांसह जळून खाक झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. दरम्यान, टेम्पोतील क्लीनर गंभीर जखमी झाला असून, त्याला तातडीने उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेनंतर काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.आग नेमकी कशामुळे लागली याचा तपास सुरू असून, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
Jalgaon: जळगाव जिल्ह्यातील नशिराबाद येथे हॉटेलला लागली आगजळगाव जिल्ह्यातील नशिराबाद येथे हॉटेलला लागली आग
शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज
आग लागल्याचे लक्षात येताच हॉटेलमधील कर्मचाऱ्यांनी हॉटेलमधले पाच ते सहा सिलेंडर बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला
जळगाव व नशिराबाद येथील अग्निशमन दलाच्या बंबानी शर्तीचे प्रयत्न करून आगीवर मिळवले नियंत्रण
आगीच्या घटनेत हॉटेलचे मोठे आर्थिक नुकसान
मांगूर माशांची तस्करी करणारा ट्रक पकडला, 4 हजार किलो मासे केले नष्टअहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेचे पथक आणि शिर्डी पोलिसांनी संयुक्त कारवाई करत प्रतिबंधित मांगूर माशांची तस्करी करणारा ट्रक पकडला आहे.. शिर्डी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील निमगाव बायपास येथून पोलिसांनी हा ट्रक ताब्यात घेत मानवी आरोग्यास हानिकारक चार हजार किलो मांगूर मासे नष्ट केले आहेत.. याप्रकरणी चार आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून 4 लाख रुपये किमतीचे मांगूर मासे आणि 25 लाख रुपये किमतीचा ट्रक असा 29 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे..
Akola: अकोल्यात ऑटो रिक्षा पलटी, एकाचा मृत्यू तर दोन जण जखमीअकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यात मजुरांना घेऊन जाणारा ऑटो रिक्षा पलटी झालाय, यात एकाचा मृत्यू तर दोन जण जखमी झाले. पहाटेच्या सुमारास हा अपघात झाला.. गावंडगाव शिवारातील पांगरताटी मार्गावरील पुलाजवळ मजुरांचा प्रवासी ऑटो रिक्षा अचानक पलटी झाला. या अपघातात ऑटोखाली दबून राजू जाधव या मजुराचा जागीच मृत्यू झाला आहे... तर दोन महिला गंभीर जखमी झाल्या.. त्यांच्यावर वाडेगाव येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत...
Sindhudurg: सिंधुदुर्गात ऐन उन्हाळ्यात दाट धुक्याची चादरसिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वत्र आज पुन्हा दाट धुके पाहायला मिळाले. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पहाटे पासून दाट धुके पडल्याने रस्ते धुक्यात हरवले होते. ऐन आंबा, काजूच्या हंगामात धुके पडत असल्यामुळे याचा थेट परीणाम मोहरावर होणार आहे. आधीच हापूस आंबा मोहरावर खार पडल्यामुळे जळून गेला आहे त्यातच पुन्हा धुके पडत असल्यामुळे याचा मोठा परीणाम आंबा काजू पिकावर होणार आहे. सतत बदलणाऱ्या वातावरणामुळे बागायतदार शेतकऱ्यांची चिंता मात्र वाढली आहे.
Pune: पुणे जिल्ह्यातील दुबईत अडकलेल्या सर्व लोकांची माहिती राज्य सरकारकडून संकलितपुणे जिल्ह्यातील दुबईत अडकलेल्या सर्व लोकांची माहिती राज्य सरकारकडून संकलित
युएई गव्हर्नमेंट केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या समन्वय करून भारतात परतण्यासाठी प्रयत्न सुरू
कालच्या फ्लाईट मध्ये विद्यार्थी आणि मुंबईतील काही नागरिक काल भारतात परतले
आजच्या फ्लाईट मध्ये महाराष्ट्रातील आणि पुण्यातील नागरिकांना विद्यार्थ्यांना साठी राज्य सरकारचे प्रय
इराण-इस्त्रायल युद्धमुळे सोलापुरात राजकीय वादइराण-इजराईल युद्धमुळे सोलापुरात राजकीय वाद
इराणच्या समर्थनाथ आज माजी आमदार नरसय्या आडम यांचे आंदोलन
इजराईल आणि अमेरिका हे युद्धखोर असल्याची टीका करतं आडम यांनी पुकारलं आंदोलन
आज सकाळी 11 वाजता जिल्हापरिषद कार्यालयाच्या पूनम गेटसमोर होणार आंदोलन
दुसरीकडे भाजप आमदार देवेंद्र कोठे यांनी इजराईलच्या समर्थनाथ केली फेसबुक पोस्ट
दहशतवाद मुक्त जागासाठी इजराईलला पाठिंबा असल्याची पोस्ट आमदार कोठे यांनी केलीय
त्यामुळे सोलापुरात युद्धचे राजकीय परिणाम होताना दिसता्यात
इंगळी येथे भूस्खलन; ७० फूट विहिरीत पोकलँड कोसळले, दोघे बचावलेकोल्हापूर जिल्ह्यातील इंगळी येथे सहा मोट विहिरीच्या दुरुस्तीचे काम सुरू असताना अचानक मुरूम घसरल्याने सुमारे २५ टन वजनाचे पोकलँड मशीन ७० फूट खोल विहिरीत कोसळले. या दुर्घटनेत ऑपरेटरसह दोघेजण पाण्यात बुडाले; मात्र ग्रामस्थांच्या तत्परतेमुळे दोघांनाही सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले. सिंता भारती व आशिष शरमण अशी जखमींची नावे असून त्यांच्यावर हुपरी येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. डॉक्टरांनी पोटातील दूषित पाणी बाहेर काढून निरीक्षणाखाली ठेवले आहे. विहिरीच्या पुनर्बांधणीसाठी ३ कोटी ४२ लाखांचा निधी मंजूर असून काम सुरू असताना हा प्रकार घडला. पोकलँड बाहेर काढण्यासाठी क्रेन बोलावण्यात येणार आहे. दरम्यान, लगतच्या रस्त्याला आणि मस्जिदीला भूस्खलनाचा धोका निर्माण झाल्याने ग्रामस्थांनी चिंता व्यक्त केली आहे.
Nashik: नाशिकच्या तपोवन वृक्षतोड प्रकरणी आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणीनाशिकच्या तपोवन वृक्ष तोड प्रकरणी आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी
मनसे पदाधिकारी आणि ॲड नितीन पंडित यांनी तपोवन वृक्ष तोड प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलीय याचिका
झाड तोडण्याच्या निर्णयाला स्थगिती देण्यासाठी नितीन पंडित यांनी दाखल केलीय याचिका
मागील सुनावणीत पालिका प्रशासनाने प्रतिज्ञापत्र सादर न केल्याने सुनावणी ढकलण्यात आली होती पुढे
शहरातील कुसुमाग्रज उद्यान आणि शहरातील इतर भागात झालेली बेकायदेशीर वृक्षतोड देखील आज न्यायालयाच्या निदर्शनास आणून देणार असल्याचा याचिकाकर्त्यांचा दावा
प्रशासनाने प्रतिज्ञापत्र सादर न केल्यास एकतर्फी सुनावणी घेण्याची मागणी आज याचिकाकर्ते करणार
आजच्या सुनावणीत तरी महापालिकेच्या वतीने प्रतिज्ञापत्र सादर करण्यात येते का ? याकडे लक्ष
Pune: पुण्यात धुलिवंदनाच्या कार्यक्रमात स्टेज कोसळलेकार्यक्रमाच्या आयोजकाविरुद्ध गुन्हा दाखल
स्टेज कोसळल्यामुळे १२ जण जखमी तर चौघांना गंभीर दुखापत
कार्यक्रमाच्या ठिकाणी स्टेजचा एक आडवा लोखंडी बीम कोसळला त्यात काही लोक जखमी झाले आहेत
याबाबत गंभीर दुखापत झालेल्या पार्थ श्रीराम पवार (वय १९) याने पोलिसात फिर्याद दिली आहे.
त्यानुसार कार्यक्रमाचे आयोजक शुभम मुकेश घोष याच्याविरुद्ध गुन्हा दाखल
विमानतळ बाधित शेतकऱ्यांना गोखले इन्स्टिट्यूट देणार गुंतवणुकीचे धडेविमानतळ बाधित शेतकऱ्यांना गोखले इन्स्टिट्यूट देणार गुंतवणुकीचे धडे
पुरंदर विमानतळ बाधित शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी शासनाकडून महत्त्वाचा निर्णय
राज्य सरकारच्या पुढाकारातून आर्थिक नियोजनाचे आणि गुंतवणुकीचे प्रशिक्षण देण्याचा निर्णय
अचानक आलेले पैसे चुकीच्या ठिकाणी गुंतवणूक होणे यासाठी शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी निर्णय
Pune: पुण्यात तीन दिवसात 301 मद्यपी चालकांवर कारवाईपुण्यात तीन दिवसात 301 मद्यपी चालकांवर कारवाई
मद्य सेवन करून वाहन चालकांच्या विरुद्ध शहर वाहतूक शाखेने विशेष मोहीम राबवत तीन दिवसात ३०१ चालकांवर कारवाई केली
अपघातांना आळा घालण्यासाठी आणि रस्ते सुरक्षेसाठी ही मोहीम हाती घेण्यात आली आहे
वाहतूक शाखेने 27 फेब्रुवारी ते एक मार्च या कालावधीत शहरातील 30 ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली होती
मद्य सेवन करून वाहन चालविताना आढळलेल्या 301 जणांवर मोटार वाहन कायद्यानुसार दंडात्मक कारवाई
Pune: राज्यात उन्हाचा तडाखा वाढणारराज्यात उन्हाचा तडाखा वाढणार
वातावरण बदलामुळे तापमान वाढले
पुढील दोन दिवसात पुण्यासह राज्यातील तापमान वाढ होणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज
विदर्भात काही भागात उष्णतेची लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे
गेल्या काही दिवसांपासून तापमान ३२ ते ३५ अंश सेल्सिअस पर्यंत पोहचले
Pune: पुणे महापालिकेचा 2026- 27 चा अर्थसंकल्प सोमवारी सादर होणारपुणे महापालिकेचा 2026- 27 चा अर्थसंकल्प सोमवारी सादर होणार
आयुक्त नवल किशोर राम स्थायी समिती समोर अर्थसंकल्प सादर करणार
९ तारखेला होणार पुणे महापालिकेचा अर्थसंकल्प सादर
गेल्या चार वर्षातला प्रशासक संपल्याने स्थायी समिती समोर अर्थसंकल्प सादर करावा लागणार
आयुक्त यांनी तयार केलेल्या अर्थसंकल्पाचा अभ्यास करून तरतुदीचा समावेश करून स्थायी समिती सर्वसाधारण सभेसमोर अर्थसंकल्प ठेवेल
Pratap Sarnaik: प्रसंगी विरोधात बसू ;पण शिवसेनेत फूट पडू देणार नाही: पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट भुमिकाधाराशिव जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांनंतर राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम देत पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी ठाम शब्दांत भूमिका स्पष्ट केली आहे.“सत्ता महत्त्वाची असली,तरी पक्षाची एकजूट त्याहून महत्त्वाची आहे.प्रसंगी आम्ही विरोधी बाकांवर बसू;पण शिवसेनेत फूट पडू देणार नाही,” असा इशारा त्यांनी दिला.
Bhandara: भंडाऱ्यात धूळवडीला गालबोट,रावणवाडी जलाशयात बोट उलटलीहोळीच्या उत्साहात नागपूरहून पर्यटनासाठी आलेल्या एका मित्रमंडळीच्या ग्रुपवर काळानं घाला घातला आहे. भंडाऱ्याच्या प्रसिद्ध रावणवाडी जलाशयात जलपर्यटन करताना बोट (डोंगा) उलटल्यानं नागपूरचा एक ३० वर्षीय तरुण बुडाला. सौरभ मेहरा असं मृत तरुणाचं नावं असून, तो नागपूरच्या धरमपेठ परिसरातील रहिवासी आहे. धुळवडीची सुट्टी साजरी करण्यासाठी नागपूरहून २० ते २२ तरुणांचा एक गट रावणवाडी इथं सहलीसाठी आला होता. यातील ५ ते ६ तरुण जलाशयात असलेल्या एका डोंग्यातून (स्थानिक बोट) फिरण्यासाठी पाण्यात उतरले. मात्र, काठापासून काही अंतरावर जाताचं पाण्याचा अंदाज नं आल्यानं हा डोंगा अचानक उलटला. बोटीतील इतर ५ जण पोहत कसेबसे काठावर आले. सौरभला पाण्याचा अंदाज नं आल्यानं तो खोल पाण्यात बुडाला आणि बेपत्ता झाला. अड्याळ पोलीस, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि स्थानिक मच्छिमारांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली. सायंकाळपर्यंत सौरभचा शोध घेण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू होते. मात्र, अंधार झाल्यामुळे आजची शोधमोहीम थांबवण्यात आली आहे. उद्या सकाळी पुन्हा एकदा बचाव पथकाकडून शोधमोहीम राबवण्यात येणार आहे.
Ratnagiri: रत्नागिरीत रुग्णालयात दाखल झाला संकासूर...कोकणात सध्या शिमगोत्सव सुरु आहे आणि शिमगोत्सवाचं प्रमुख आकर्षण असतं ते म्हणजे संकासूर ...शिमगोत्सवात हा संकासूर तुम्हाला सर्रास कोकणातील रस्त्यावर दिसेल..संकासूराला देवाचा मान दिला जातो त्यामुळे अनेकजण त्याचा आशिर्वाद घेत असतात हाच संकासूर रत्नागिरीतील सांबरे रुग्णालयात रुग्णांना आशिर्वाद देण्यासाठी दाखल झालाय.संकासूराच्या येण्यानं रुग्णांमध्ये देखील एक नवी उर्जा निर्माण झाली होती.रुग्णालयात आलेला संकासून अनेकांना समाधान देऊन गेला..
Yavatmal: यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याची प्रतीक्षाएक रुपयात पिक विमा बंद करून त्या ऐवजी पीक कापणी प्रयोगाच्या निकषावर पिक विमा देण्याचा निर्णय विमा कंपन्यांनी घेतला या नव्या निकषानुसार यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याची मदत दिली जाणार आहे या अहवालानुसार यंदा पिकाचे उत्पन्न कमी झाले आहे यामुळे शेतकऱ्यांना पीक विमा मिळण्याची अपेक्षा आहे पीक विम्याचा अंतिम अहवाल राज्यस्तरावरून प्रसिद्ध होणार आहे यावर्षी संपूर्ण जिल्ह्यात पीक परिस्थिती चिंताजनक आहे.
मागासवर्गीय शासकीय वसतिगृहांना महापुरुषांची नावे देण्याचा सामाजिक न्याय विभागाचा निर्णयसामाजिक न्याय विभागांतर्गत चालविण्यात येणाऱ्या मागासवर्गीय मुला-मुलींच्या शासकीय वसतिगृहांना महापुरुषांची नावे देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील ४४९ वसतिगृहांपैकी ४१६ वसतिगृहांच्या नावांना तसेच यापुढे सामाजिक न्याय विभागांतर्गत नव्याने सुरू होणाऱ्या मुलांच्या वसतिगृहांना “डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतिगृह” आणि मुलींच्या वसतिगृहांना “सावित्रिबाई फुले शासकीय वसतिगृह” अशी नावे देण्यास मान्यता देण्यात आली आहे. याबाबतचा शासन निर्णय सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने निर्गमित केला आहे.
सध्या अनेक वसतिगृहांच्या नावांमध्ये ‘मागासवर्गीय’ हा शब्द वापरण्यात आला आहे. ‘मागासवर्गीय’ हा शब्द समाजातील उपेक्षित आणि शोषित घटकांकडे निर्देश करतो व त्यातून विषमता अधोरेखित होते. त्यामुळे संस्थांची ओळख एका विशिष्ट घटकापुरती मर्यादित राहते आणि समाजाचा दृष्टिकोनही त्यानुसार घडतो. ही बाब लक्षात घेऊन वसतिगृहांच्या नावातील ‘मागासवर्गीय’ हा शब्द वगळून त्यांना महापुरुषांची नावे देण्याचा
युद्धाच्या पार्श्वभूमीवर पेट्रोल महाग होणार, अफवेने नांदेड पाठोपाठ परभणीत ही पेट्रोल पंपांवर गर्दीयुद्धाच्या पारश्वभूमीवर पेट्रोल महाग होणार आहे अशा अफवेने नांदेड पाठोपाठ परभणीत ही पेट्रोल पंपांवर मोठी गर्दी उसळल्याचे चित्र निर्माण झाले आहे.शहरातील भरोसे,दुर्रानी तसेच आर आर पेट्रोल पंपासह अनेक पंपवर दुचाकी चालकांनी मोठी गर्दी केली आहे.ज्यामुळे पेट्रोल पंप चालक ही हैराण झाले आहे.प्रशासनाने ही अफवा असून इंधन तुटवडा होणार नाही असे आवाहन करावे जेणेकरून ही गर्दी कमी होवून नागरिक अफवांना बळी पडणार नाहीत अशी मागणी केली जात आहे.