Ramayana movie final edit supervised by Nolan: नितेश तिवारी दिग्दर्शित रामायण कधी रिलीज होणार? याविषयी प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. या चित्रपटाच्या निगडीत बरेच नवनवीन अपडेट समोर येत आहेत. लेटेस्ट रिपोर्ट्सनुसार, हॉलिवूड फिल्ममेकर ख्रिस्तोफर नोलन या चित्रपटाच्या एडिटिंगचा भाग असणार आहे. रामायण चित्रपटाच्या फायनल एडिट रिव्ह्यूसाठी त्यांना अप्रोच करण्यात आलंय. यामुळे रामायण या चित्रपटासाठी ही मोठी बाब मानली जात आहे. दरम्यान, ही बातमी समोर येताच चाहत्यांमध्ये हा चित्रपट पाहण्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
मनी कंट्रोलने दिलेल्या वृत्तानुसार, रामायण चित्रपटाचे फायनल एडिटचा आढावा घेण्यास आणि पोस्ट - प्रॉडक्शनवर सुपरवाइज करण्यास, हॉलिवूड फिल्ममेकर ख्रिस्तोफर नोलन यांना विचारण्यात आलं आहे. असेही वृत्त समोर येत आहेत की, निर्माता नमित मल्होत्रा पोस्ट प्रॉडक्शनसाठी ख्रिस्तोफर नोलनला बोर्डवर आणत आहेत. यामुळे त्यांच्या नजरेतून या चित्रपटात बरेच बदल होतील. हे प्रेक्षकवर्गाला चित्रपटातून स्पष्टपणे दिसून येईल.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, रामायण या ऐतिहासिक प्रोजेक्टवर ख्रिस्तोफर नोलन यांच्यासोबत सिनमेटोग्राफर Hoyte van Hoytema देखील काम करणार आहे. 72 दिवसांत त्यांचं हे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. या चित्रपटासाठी दोघेही ऑगस्ट 2026 पासून कामाला सुरुवात करतील. दोघेही रामायण या चित्रपटाच्या तांत्रिक आणि दृश्य घटकांवर विशेष काम करतील. रिपोर्ट्समध्ये असेही नमूद आहे की, ऑस्कर विजेत्या एडिटर जेनिफर लेम, क्रिस्टोफर नोलन यांच्या देखरेखेखाली फायलन एडिट करतील. तसेच व्हॅन होयटेमा आयमॅक्स स्क्रीनसाठी तांत्रिक मास्टरिंग आणि कलर ग्रेडिंगच्या कामांकडे बारकाईने लक्ष देतील.
क्रिस्टोफर नोलन यांना या चित्रपटाची कथा माहित असून, ते या चित्रपटाचा अंतिम कट हाताळतील. या संपूर्ण प्रक्रियेत नितेश तिवारी त्यांच्यासोबत असतील. 22 ऑक्टोबरपर्यंत या चित्रपटासाठी काम करतील. दरम्यान, अद्याप तरी या चित्रपटाच्या अपडेटविषयी कोणतीही माहिती समोर आलेली नाही. याबाबत ऑफिशियल अनाउंसमेंट करण्यात आलेली नाही.
रामायण या चित्रपटात अभिनेता रणबीर कपूर भगवान रामांची भूमिका साकारणार आहे. तर, अभिनेत्री साई पल्लवी माता सीता यांची भूमिका साकारणार आहे. तर, रवि दुबे भगवान लक्ष्मण यांची भूमिका साकारणार आहे. तसेच सनी देओल भगवान हनुमान यांची भूमिका साकारणार असल्याची माहिती आहे. या व्यतिरिक्त रामायणमध्ये अरुण गोविल, इंदिरा कृष्णन, रकुल प्रीत सिंहसारखे तगडे स्टारकास्ट प्रमुख भूमिका साकारणार आहेत. हा सिनेमा 8 नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.