वाई:-पी.एम.श्री.नगरपालिका शाळा क्र. १० मध्ये बालआनंद बाजार उत्साहात साजरा
esakal March 04, 2026 05:45 PM

वाईत बालआनंद बाजारामध्ये
तीस हजारांची झाली उलाढाल

वाई, ता. ४ : येथील पीएम श्री नगरपालिका शाळा क्रमांक १० मध्ये आयोजित केलेल्या बालआनंद बाजारात विद्यार्थ्यांनी २०० हून अधिक स्टॉल उभारले हाेते.
त्यात विविध प्रकारच्या पालेभाज्या, फळे, धान्य, गृहोपयोगी वस्तू बाजारात विक्रीसाठी ठेवल्या होत्या. पालकांसह पंचक्रोशीतील अनेक नागरिकांनी उस्फूर्तपणे खरेदी केली. बाजारात २५ ते ३० हजारांची उलाढाल झाल्याचे सांगण्यात आले.
पालिकेचे शिक्षण मंडळ प्रशासनाधिकारी साईनाथ वाळेकर यांच्या हस्ते या बाजाराचे उद्घाटन झाले. नगरसेवक सुशीलकुमार खरात, गुरुप्रसाद चव्हाण, नगरसेविका नीलिमा खरात, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अमोल काळे, उपाध्यक्ष प्रियांका जाधव, सदस्य मीना वायदंडे उपस्थित होते.
मुख्याध्यापिका शारदा परामणे यांनी या बालआनंद बाजाराचे आयोजन केले हाेते. ऋषिकेश जगदाळे, सचिन घाडगे यांनी मार्गदर्शन केले. श्याम पवार यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले. गजानन खंदारे यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी किसन रेंजर, संगीता अरगडे, मुरलीधर जाधव, संतोष माडकर, अश्विनी सूर्यवंशी, आशा मोरे, रूपाली पांढरपोटे, प्रीती ससाणे, सीमा तांबे, संतोषी साळुंखे, रंजना पवार, श्री. मोहिते, सायली चव्हाण आदींनी परिश्रम घेतले.

------
B07645
वाई : पीएम श्री नगरपालिका शाळा क्रमांक दहामधील बालआनंद बाजारात विद्यार्थ्यांनी लावलेले स्टॉल.

.......................................

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.