Sawantwadi Banda Khamdev Naka Car Accident : सावंतवाडीतील बांदा खामदेव नाका येथे भीषण अपघात घडला असून कार थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या दरीत कोसळल्याने चार वर्षांच्या चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात रात्रीच्या सुमारास घडला. संबंधित कुटुंब कारमधून प्रवास करत असताना वाहन चालकाचा गाडीवरील ताबा सुटला. त्यामुळे कार रस्त्याच्या कडेला जाऊन थेट दरीत कोसळली.
Mumbai-Goa Highway Accident : होळीच्या सणावर विरजण! 18 वर्षाच्या बहिणीचा भावासमोरच दुर्दैवी अंत; खारेपाटणमधील शेट्ये कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगरअपघाताच्या वेळी चार वर्षीय बालक खिडकीतून बाहेर फेकले गेले. त्यानंतर कार खाली कोसळताना त्याच्यावरून गेल्याने त्याचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. या भीषण अपघातात कुटुंबातील अन्य सदस्य मात्र सुखरूप बचावले असल्याची माहिती मिळाली आहे.
Tajuddin Baba Dargah Nagpur : दर्ग्यावर दर्शनासाठी गेला अन् बेपत्ता झाला! नागपुरात दफन केलेला साजिद खानचा मृतदेह 'असा' आणला मालेगावात; काय आहे संपूर्ण प्रकरण?या भीषण अपघातात कुटुंबातील अन्य सदस्य मात्र सुखरूप बचावले असल्याची माहिती मिळाली आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पुढील तपास सुरू असून अपघाताचे नेमके कारण शोधले जात आहे.