ईश्वरपूर : इस्रायल-इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सांगली व ईश्वरपूर येथील १० विमा प्रतिनिधी दुबईमध्ये अडकले आहेत. एका आरोग्य विमा कंपनीच्या माध्यमातून ते दुबई येथे एका कार्यक्रमासाठी गेले होते.
२६ फेब्रुवारीला सायंकाळी मुंबई येथील विमानतळावरून हे प्रतिनिधी त्यांच्या कंपनीतील अन्य सहकाऱ्यांसमवेत दुबईला गेले आहेत. कोल्हापूर, सांगली, सातारा तसेच विदर्भ मराठवाड्यातील एकूण तीनशेहून अधिक विमा प्रतिनिधी आहेत. त्यात सांगली जिल्ह्यातील १० जणांचा समावेश आहे.
Jalgaon Tourists : जळगावकर दुबईत सुरक्षित! युद्धाच्या भडक्यामुळे मुक्काम लांबला, पण दुबई सरकार करणार खाण्यापिण्याचा खर्चसांगलीचे प्रतिनिधी दिलावर शमनजी यांच्यासह ईश्वरपूर येथील विमा प्रतिनिधी त्यांच्यासोबत आहेत. २ मार्चला रात्री हे लोक परतणार होते. दरम्यान, २७ मार्चला या सर्वांनी दुबई येथील सुप्रसिद्ध पर्यटनस्थळ बुर्ज खलिफा या ठिकाणी भेट दिली. त्यानंतर थोड्याच वेळात बुर्ज खलिफा परिसरात क्षेपणास्त्राचा हल्ला झाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली.
परंतु, प्रत्यक्षात तो हल्ला जवळच्या अल जुमैरा हॉटेलवर झाला होता. त्यानंतरही रात्री उशिरा व दुसऱ्या दिवशी सुमारे दीडशेपेक्षा जास्त हल्ले इराणने केले होते आणि ते दुबईने हवेतच परतवून लावले होते. यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या परिस्थितीचा विचार करून दुबई सरकारने पर्यटकांना ज्या-त्या ठिकाणी स्थित होण्याच्या सूचना केल्या होत्या.
Galli Brothers : दुबईतील गलाई बांधव सुरक्षित; युद्धजन्य परिस्थितीमुळे आखाती देशांमध्ये चिंतेचे वातावरणसर्व कार्यक्रम रद्द केले होते. त्यानंतर सोमवारपासून स्थानिक वाहतूक सुरू झाली आहे. विमा प्रतिनिधींना त्यांचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यास सांगण्यात आले होते. युद्धजन्य परिस्थितीचा विचार करता भारतातील जे लोक दुबईत अडकले आहेत, त्या सर्वांना होणारा विलंब, त्यांना बसणारी आर्थिक झळ या सगळ्याचा विचार करून दुबई सरकारने हा खर्च आपण करणार असल्याची घोषणा केली आहे.
सुरक्षेच्या कारणास्तव सर्वांना हॉटेलमधून बाहेर न पडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दुबईच्या विमानतळावर सुमारे वीस हजार प्रवासी अडकले होते, त्यात बहुतांश भारतीय होते. सोमवारी रात्री खास व्यवस्था करून यातील काही पर्यटकांना मायदेशी पोचवण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत.
जिल्ह्यातील सर्व प्रवासी दुबईतील हॉटेल ‘हॉलिडेइन’मध्ये सुरक्षित आहेत. एअर इंडियाकडून विमान रद्द झाल्याचा संदेश मिळाल्याने हे पर्यटक सध्या इथेच अडकून आहेत. भारतीय दूतावासाशी त्यांचा संपर्क झाला असून, एअर इंडियाकडून पुढचा संदेश येण्याच्या ते प्रतीक्षेत थांबले आहेत.