Sangli Student Auto : एका रिक्षात दहा ते बारा विद्यार्थी; धोकादायक वाहतुकीला मुभा? वर्षभरात एकच कारवाई
esakal March 05, 2026 04:45 PM

सांगली : तीनआसनी रिक्षात दहा ते बारा विद्यार्थी कोंबले जातात. आसन व्यवस्थेत अनधिकृत पद्धतीने बदल केला जातो. मात्र, विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळणाऱ्या वाहनधारकांना चाप लावण्यासाठी कुणीही पुढाकार घेत नाही.

‘आरटीओ’नी देखील गतवर्षात केवळ एक कारवाई केली आहे. त्यामुळे धोकादायक वाहतुकीला मुभा दिली आहे का, असा प्रश्न पालकांतून उपस्थित होत आहे. परवानगीशिवाय आसन व्यवस्थेत बदल केला म्हणून ‘आरटीओ’ने गतवर्षी केवळ एका वाहनावर कारवाई केली आहे. त्यात दोन हजार रुपयांचा दंड केला आहे, तोही त्याने ‘आरटीओ’कडे भरलेला नाही.

Sangli RTO : वाहनधारकांना नाही शिस्त; ‘आरटीओ’ची वसुलीवर भिस्त; गतवर्षी २५ हजार कारवाया; ५ कोटी रुपयांची दंड वसुली

ही कारवाई रिक्षावरच केली की नाही, याचा तपशील नाही, पण शहरात एकीकडे शेकडो रिक्षाचालक हे आसन व्यवस्थेत बदल करत आहे. यात गंभीर बाब अशी आहे की, शाळकरी मुलांची ने-आण करणाऱ्यां रिक्षामध्ये सर्रास १० ते १२ मुलांना बसवले जाते.

‘आरटीओ’ने ३३ प्रकारांत प्रत्येकी १ कारवाई केली आहे. १९२ प्रकारच्या कारवाईत शंभरावर कारवाया या एकअंकी आहेत.

Kolhapur Vehicles : १५ वर्षे पूर्ण झालेल्या २३ हजार वाहनांची पुनर्तपासणी; विनातपासणी फिरणाऱ्या वाहनांवर कारवाई कधी?

रिक्षांमध्ये विद्यार्थी कोंबून भरले जातात. रिक्षाचालक बाजूलाच विद्यार्थ्यांच्या स्कूलबॅग अडकवतो. त्यादेखील अडथळा ठरतात.

विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळणाऱ्या रिक्षाचालकांवर चाप लागण्यासाठी ‘आरटीओ’ने वेगळी मोहीम राबवली का? पालकांनी आणि शाळांनीही या प्रकाराकडे गांभीर्याने पाहण्याची गरज निर्माण झाली आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.