वारकरी संप्रदायाचे महान संत Sant Tukaram Maharaj यांच्या ३७८ व्या बीज सोहळ्यानिमित्त देहू नगरीत भक्तिमय वातावरण पाहायला मिळत आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो भाविक देहू येथे दाखल झाले असून मंदिर परिसरात मोठी गर्दी झाली आहे.
Live : राज्यसभा निवडणुकीसाठी शरद पवारांनी उमेदवारी अर्ज भरलाराज्यसभा निवडणुकीसाठी शरद पवारांनी उमेदवारी अर्ज भरला
सुप्रिया सुळे, संजय राऊत आणि हर्षवर्धन सपकाळ, यांच्या उपस्थितीत अर्ज दाखल
Pune Live : विमान अपघात प्रकरण: वीएसआर कंपनीच्या अधिकाऱ्यांची सीआयडी कार्यालयात चौकशीविमान अपघात प्रकरणाच्या तपासात महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. या प्रकरणात V. K. Singh यांची Crime Investigation Department (सीआयडी) कडून चौकशी सुरू करण्यात आली आहे. सध्या सीआयडी कार्यालयात सिंग यांची सविस्तर चौकशी सुरू असल्याची माहिती मिळत आहे.
Pune: सीआयडीकडून व्हीएसआर वेंचर्स कंपनीची चौकशी होणारPune: सीआयडीकडून व्हीएसआर वेंचर्स कंपनीची चौकशी होणार
सीआयडीकडून व्हीएसआर वेंचर्स कंपनीची चौकशी होणार
सी आय डी ची वी एस आर कंपनीला प्रश्नावली
वी एस आर चे रोहित सिंग यांना सुद्धा सी आय डी बोलावण्याची शक्यता
अजित पवार यांच्या अपघाताबाबत म्हणणे मांडण्यासाठी सी आय डी कडून पत्र
कागल एमआयडीसी मध्ये परप्रांतीय कामगाराचा खूनकागल एमआयडीसी मध्ये परप्रांतीय कामगाराचा खून
कागल येथील पंचतारांकित औद्योगिक वसाहत परिसरात होळीच्या दिवशी परप्रांतीय कामगारांमध्ये झालेल्या वादातून एका तरुणाचा लोखंडी पाइपने मारहाण करून खून केल्याची धक्कादायक घटना घडली.
उमेश कुमार बसंती कुमार (वय ३०, मूळ रा. नेवरिया, ता. इकौना, जि. श्रावस्ती, उत्तर प्रदेश; सध्या रा. फाइव्ह स्टार एमआयडीसी, कागल) असे मृत तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोने -चांदीच्या दरात सलग दुसऱ्या दिवशी घसरणसोने -चांदीच्या दरात सलग दुसऱ्या दिवशी घसरण
सोन्याच्या दरात 700 रुपयांची तर चांदीच्या दरात 3 हजार रुपयांची घसरण
जळगाव सुवर्णनगरीत आज सोन्याचे दर 1 लाख 61 हजार 300 रुपयांवर जीएसटीसह 1 लाख 66 हजार 139 रुपयांवर
चांदीचे दर 2 लाख 72 हजार रुपयांवर तर जीएसटीसह 2 लाख 80 हजार 160 रुपयांवर
Nashik Live : शेअर मार्केटच्या आमिषाने ज्योतिषाकडून कोट्यवधींची फसवणूक, सायबर पोलिसांची लूक आऊट नोटीसनाशिकमध्ये अंजनेय ज्योतिष केंद्राच्या नावाने कार्यालय चालवणाऱ्या ज्योतिष सचिन देशमुख याच्याविरोधात सायबर पोलिसांनी लूक आऊट नोटीस बजावली आहे. भविष्य सांगण्याच्या नावाखाली लोकांना शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास जादा परतावा मिळेल असे आमिष दाखवून त्याने फसवणूक केल्याचा आरोप आहे. तपासात आतापर्यंत सुमारे पन्नास ते साठ जणांची तब्बल बारा कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर सचिन देशमुख फरार झाला असून पोलिसांनी त्याच्या कार्यालयाला सील ठोकले आहे आणि त्याचा शोध सुरू आहे.
Mumbai Live: ई-चलन विरोधात वाहतूकदारांचा संप; बस आणि ट्रक चालक आझाद मैदानाकडे रवानाई-चलन प्रणालीच्या विरोधात आज वाहतूकदारांनी संप पुकारला असून मोठ्या संख्येने बस चालक आणि ट्रक चालक रस्त्यावर उतरले आहेत. संपात सहभागी होण्यासाठी विविध भागांतून चालकांचे ताफे आझाद मैदानाच्या दिशेने निघाले आहेत. या आंदोलनामुळे शहरातील वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.
Chhatrapati Sambhajinagar Live : छत्रपती संभाजीनगरमध्ये सोलार पोर्टल बदलांवरून महावितरणविरोधात मोर्चामहावितरणने सोलार पोर्टलमध्ये केलेल्या बदलांमुळे ग्राहकांवर परिणाम होत असल्याचा आरोप करत नागरिक, व्यापारी, उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधी तसेच विविध ग्राहक संघटनांच्या वतीने क्रांती चौक येथून महावितरण कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या बदलांमुळे सोलार योजनेचा लाभ घेणाऱ्या ग्राहकांना अडचणी येत असल्याचे सांगत आंदोलनकर्त्यांनी महावितरणने निर्णय तात्काळ मागे घ्यावा आणि ग्राहकांना दिलासा द्यावा, अशी मागणी केली आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर परिसरात मोठ्या प्रमाणात नागरिकांची उपस्थिती पाहायला मिळत आहे.
Mumbai Live : गोराई बस डेपोमध्ये दोन विशाल अजगर सापडल्याने खळबळमुंबईतील गोराई बस डेपो परिसरात दोन विशाल अजगर आढळल्याने एकच खळबळ उडाली. सायंकाळच्या सुमारास कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास हे अजगर आले, त्यानंतर तात्काळ वनविभाग आणि सर्पमित्रांना पाचारण करण्यात आले. दोन्ही अजगरांना सुरक्षितरीत्या पकडून त्यांचे बचावकार्य करण्यात आले असून या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार अजगरांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार आहे. या घटनेमुळे काही काळ डेपो परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
Vasai-Virar Live: वसई विरार महापालिकेत दोन दिवस पाणीपुरवठा राहणार बंद- वसई विरार महापालिकेचा दोन दिवस पाणीपुरवठा राहणार बंद
- सुर्या टप्पा 01 जुनी सुर्या योजना पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी नाल्यामध्ये ना दुरुस्त झाली असल्याने, भरती , ओहोटी वेळी काम करावे लागत असल्याने कामास अडथळा निर्माण होत आहे.
- जुन्या योजने अंतर्गत होणारा 100 द ल ली पाणीपुरवठा पूर्णपणे बंद ठेवण्यात आला आहे.
- वसई विरार महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून युद्ध पातळीवर दुरुस्तीचे काम सुरू असून, उध्या 6 मार्च पर्यंत नादुरुस्त पाईपलाईन पूर्ण होण्याची शक्यता वर्तवली आहे
- त्यामुळे नागरिकांनी पालिकेला सहकार्य करावे असे अहवान पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेंद्र ठाकरे यांनी केले आहे.
Nashik: नाशिकमध्ये स्वीकृत नगरसेवक पदासाठी भाजपकडे तब्बल 500 इच्छुक उमेदवारांनी केले अर्जस्वीकृत नगरसेवक पदासाठी भाजपकडे तब्बल 500 इच्छुक उमेदवारांनी केले अर्ज
6 स्वीकृत नगरसेवक पदासाठी 500 जणांनी अर्ज केल्याने भाजपची डोकेदुखी पुन्हा वाढण्याची शक्यता
स्वीकृत नगरसेवक पद मिळण्यासाठी इच्छुकांची जोरदार बिल्डिंग
मात्र 500 जणांपैकी भाजप नेतृत्व कुणाला संधी देणार, याकडे लक्ष
Dehu News : देहूनगरीत आज संत तुकाराम महाराज यांचा 378 वा बीज सोहळाजगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचा 378 वा बीज सोहळा मोठ्या उत्साहात आज देहू नगरीत संपन्न होणार आहे. बारा वाजता नांदूरकीच्या झाडावर भाविक आपल्या हातातील पुष्प अर्पण करून हा सोहळा साजरा करणार आहे. या बीज सूर्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक देहू नगरीत दाखल होत आहेत.
Pune News : पुण्यात दोन तास रिक्षा बंद राहणार, काय आहे कारण?पुण्यात दोन तास रिक्षा संघटना आणि प्रवासी मालवाहतूक संघटनांच्या आंदोलनामुळे वाहतूक बंद असणार
ई चलनाविरुद्ध पुण्यात आज रिक्षा संघटना आणि मालवाहतूकदार संयुक्त कृती समितीचे निदर्शने
आंदोलनादरम्यान दोन तास रिक्षा आणि प्रवासी मालवाहतूक बंद असणार
Chikkodi news : उपराष्ट्रपती, राज्यपालांसह उपमुख्यमंत्री आज येडूरमध्येचिक्कोडी : श्री क्षेत्र येडूर येथे वीरभद्र देवस्थान आणि काडसिद्धेश्वर संस्थान मठ यांच्यावतीने आयोजित महाकुंभाभिषेक, राजगोपुर लोकार्पण, लक्षदीपोत्सव व महाकृष्णाआरती कार्यक्रमांसाठी मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे. गुरुवारी (ता. ५) उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन, राज्यपाल थावरचंद गेहलोत, उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्यासह विविध मान्यवर येडूर येथे येत आहेत.
Government of Karnataka : खामेनेई यांच्या हत्येच्या निषेधार्थ आंदोलन करणाऱ्यांवर कारवाईबंगळूर : अमेरिका आणि इस्रायल यांनी केलेल्या संयुक्त हवाई हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांच्या हत्येच्या निषेधार्थ राज्यात विविध ठिकाणी आंदोलन करण्यात आले. मात्र, नियमांचे उल्लंघन करून आंदोलन करणाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत, अशी माहिती गृहमंत्री जी. परमेश्वर यांनी बुधवारी दिली.
Tapovan tree cutting case : तपोवन वृक्षतोड प्रकरणी उच्च न्यायालयाचा नाशिक महापालिकेला दणकानाशिकमधील तपोवन परिसरातील वृक्षतोड प्रकरणात मोठी न्यायालयीन घडामोड झाली आहे. मुंबई उच्च न्यायालय यांनी सुनावणीदरम्यान नाशिक महानगरपालिका यांच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त करत चांगलेच झापले आहे. या प्रकरणात महापालिका आणि वृक्ष प्राधिकरण विभागाला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले होते. मात्र, बुधवारीही मनपा प्रतिज्ञापत्र सादर करण्यात अपयशी ठरल्याने न्यायालयाने स्पष्ट शब्दांत इशारा दिला आहे की यापुढे कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही. दरम्यान, मनपाने हरित लवादात सुरू असलेले प्रकरण प्रथम उच्च न्यायालयात चालवावे, असा युक्तिवाद केला होता. मात्र न्यायालयाने हा युक्तिवाद फेटाळून लावत प्रकरण हस्तांतरित करण्यास नकार दिला आहे.
CM Nitish Kumar : मुख्यमंत्री नितीशकुमार राज्यसभेत जाणार? बिहारमध्ये रंगली जोरदार चर्चापाटणा : बिहारच्या राजकारणात राजकीय होळीची वेगळीच चर्चा गेले दोन दिवस रंगली आहे. सन २००५ पासून बिहारमध्ये सत्तेच्या केंद्रस्थानी असलेले मुख्यमंत्री नितीशकुमार राज्यसभेत जाणार असल्याची जोरदार चर्चा बिहारमध्ये रंगली आहे. ‘राज्यसभेवर जाण्याचा निर्णय संयुक्त जनता दल अर्थात ‘जेडीयू’चा आहे आणि उमेदवार कोण असावा, हे त्यांनाच ठरवायचे आहे,’ असे स्पष्ट करून भाजपने हा चेंडू ‘जेडीयू’च्याच कोर्टात ढकलल्याचे चित्र आहे.
Nagpur News : एसबीआय एनर्जी लिमिटेड कंपनीच्या स्फोटातील आरोपी कंपनी मालक अद्यापही फरार- राऊळगाव येथील एसबीआय एनर्जी लिमिटेड कंपनीच्या स्फोटातील आरोपी कंपनी मालक अद्यापही फरार
- रविवारी झालेल्या स्फोटात 21 आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
- त्यापैकी कंपनीचे संचालक, उपाध्यक्ष, महाव्यवस्थापक, प्रोडक्शन व्यवस्थापक, सुपरवायझर अशा 11 आरोपींना अटक करण्यात आलीये.
- मात्र कंपनीचे मालक संजय चौधरी आणि आलोक चौधरी हे अजूनही फरारच आहेत.
- घटनेच्या दिवशी संजय आणि आलोक चौधरी छत्तीसगडच्या रायपूरमधून नागपूरकडे निघाले होते.
- ते थेट कंपनीत जाणार होते, परंतु गुन्हा दाखल झाल्यानंतर ते आऊट ऑफ झाले असून त्यांचा नागपूर ग्रामीण पोलीस शोध घेत आहेत.
Gold and silver rates : सोन्या-चांदीच्या भावात घसरण; इराण युद्धाचा परिणाम, सुवर्ण बाजारात अस्थिर वातावरणLatest Marathi Live Updates 5 March 2026 : अमेरिका व इराणच्या युद्धामुळे सोन्या-चांदीचे भाव रविवारी (ता. १) वाढले होते. मात्र, सोमवारी (ता. २) सोन्याच्या भावात दोन हजार ७०० रुपयांची घट झाली, तर चांदीचे भाव मात्र ‘जैसे थे’च होते. मात्र, आजही सोन्याच्या भावात ५८०० रुपयांची, तर चांदीत २४ हजारांची घसरण झाली आहे. युद्धामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात खेळते भांडवल नसल्यानेच ही घसरण झाल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. सोमवारी (ता.२) सोन्याच्या भावात दोन हजार ७०० रुपयांची घसरण झाली. त्यामुळे सोने एक लाख ६७ हजार ८०० (प्रतिदहा ग्रॅम) विनाजीएसटी पोहोचले होते. काल (ता.४) सोन्याच्या भावात पुन्हा ५८०० रुपयांची घसरण झाली. विनाजीएसटी एक लाख ६२ हजार असा भाव होता. याशिवाय देश-राज्यातील इतर महत्त्वाच्या घडामोडी, वाहतूक कोंडी, राजकीय हालचाली, क्रीडा, मनोरंजन आणि मान्सूनविषयक अपडेट्स यांची सविस्तर माहिती एका क्लिकवर उपलब्ध आहे.