Axar Patel: अहमदाबादमध्ये सामना? मैं हूँ ना ! अंतिम सामन्याबाबत अक्षर पटेलकडून निर्धास्त राहण्याचा दिलासा
esakal March 07, 2026 02:45 PM

अहमदाबाद : विश्वकरंडक स्पर्धेतील सामन्यांचे अपयश आणि अहमदाबादमधील स्टेडियम यावर सोशल मीडियावर मोठी चर्चा होत असते, पण स्थानिक खेळाडू अक्षर पटेलने मैं हूँ ना..! असा हसत हसत दिलासा दिला.

२०२३ मधील एकदिवसीय विश्वकरंडक स्पर्धेतील अंतिम सामन्यात भारताचा ऑस्ट्रेलियाकडून पराभव झाला आणि देशभरात सर्वांचा हिरमोड झाला होता. या टी-२० स्पर्धेत काही दिवसांपूर्वी दक्षिण आफ्रिकेविरुद्धही भारताची हार झाली. आता रविवारी अंतिम सामना होणार असल्याने भारतीय संघाचे काय होणार, अशी चर्चा रंगू लागली आहे.

T20 World Cup: इशान किशनच ओपनर! सूर्याचा विश्वास पठ्ठ्याने सार्थ ठरवला, 7 Six अन् फिफ्टी; संजूचे स्थान धोक्यात

मुंबईतील इंग्लंडविरुद्धच्या उपांत्य सामन्यात दोन अफलातून झेल पकडणारा उपकर्णधार अक्षर पटेल मात्र अंतिम सामन्याबाबतही आशावादी आहे. अक्षर हा गुजरातचा खेळाडू. अहमदाबादमधील स्टेडियम हे त्याचे होम ग्राउंड, पण तो दोन वर्षांनंतर येथे खेळणार आहे. कोणत्याही प्रकारच्या विश्वकरंडक सामन्यात तो येथे खेळलेला नाही. आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात त्याला वगळण्यात आले होते, त्यावरून टीकाही झाली होती.

विश्वकरंडक स्पर्धेतील सामना घरच्या मैदानावर खेळण्याची गौरव आणि सन्मान काही वेगळाच असतो. माझा खेळ पाहण्यासाठी माझा मुलगा, कुटुंब येईल. त्यांच्यासमोर मी प्रथमच खेळेने आणि वर्ल्डकपमधील सामने व अहमदाबादमधील स्टेडियममधील अपयश याची चिंता नसावी, असे अक्षर म्हणाला.

उपांत्य सामन्यात अक्षरने इंग्लंड कर्णधार हॅरी ब्रुकचा पाठीमागे धावत जात अफलातून झेल पकडला, तर धोकादायक ठरू लागलेल्या विल जॅक्सचा झेल दुबेने पकडला असला तरी अक्षरने सीमारेषेवर चेंडू पकडला आणि धावण्याच्या ओघात बाहेर जाण्याअगोदर तेथे उभा असलेल्या दुबेकडे चेंडू फेकला. त्यामुळे झेल दुबेच्या नावावर लागला. या दोन झेलांबाबत विचारले असता अक्षर म्हणाला, ब्रुकचा झेल फारच कठीण होता. माझ्यासाठी तो सर्वोत्तम होता. हा दिवस काय होता कळला नाही. चेंडू माझ्या मागेच लागला होता, असे अक्षर हसत हसत म्हणाला.

Ryan Ten Doeschate: भारतीय संघातील उणिवांची कबुली; सलामीवीर अन् इतर फलंदाजांचे ऑफस्पिनर्ससमोर अपयश : रायन दोशहाते

मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना सुरुवातीला इंग्लंडने फलंदाज गमावूनही लढा कायम ठेवला. तोडीस तोड फलंदाजी केली जात होती. सामना हातून निसटत चालला होता का, याबाबत विचारले असता अक्षर म्हणाला, बुमरा आणि अर्शदीप यांची षटके शिल्लक होती. त्यामुळे चिंता नव्हती, परंतु इंग्लंडचा प्रत्येक फलंदाज आक्रमक फलंदाजी करणार, हे उघड होते. त्यामुळे दडपण घ्यायचे नाही, हे आम्ही ठरवले होते.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.