Success Story: शेतकऱ्याच्या मुलाची भरारी; अजित देशमुख यांची पोलिस उपनिरीक्षकपदी निवड
esakal March 07, 2026 02:45 PM

धानोरा : अंबाजोगाई तालुक्यातील माकेगाव येथील प्रगतशील शेतकरी जयसिंगराव देशमुख यांचा पुत्र अजित देशमुख यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून पोलिस उपनिरीक्षकपदी निवड झाली आहे.

माकेगावातून पहिल्यांदाच पोलिस उपनिरीक्षक होण्याचा मान त्याने मिळवल्याने संपूर्ण तालुक्यात कौतुक होत आहे. या यशाबद्दल गावकऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात फटाक्यांची आतषबाजी करत आणि पेढे वाटून आनंद साजरा केला.

अजितच्या या कामगिरीमुळे आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण झाले असून, सर्व स्तरांतून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Success Story: कष्टाचं चीज! सात नोकऱ्या अन् आता थेट फौजदार; आई वडिलांनी पाहिलेलं स्वप्न रवींद्र नहिराळे याने जिद्दीने उतरवलं सत्यात

अजित यांचे प्राथमिक शिक्षण गावातील जिल्हा परिषद शाळा येथे, माध्यमिक शिक्षण ममदापूर येथील संभाजीराव बडगिरे महाविद्यालयात तर पदवीचे शिक्षण लातूर येथे झाले आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.