महाबळेश्वर (सातारा) : सुरूर ते पोलादपूर राज्य महामार्गाच्या कामाला वारंवार मागणी करूनही गती मिळत नसल्याने महाबळेश्वरातील नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला (Mahabaleshwar Bandh News) आहे. याच्या निषेधार्थ रविवारी (ता. आठ) महिला दिन व रंगपंचमीच्या दिवशी महाबळेश्वर शहर कडकडीत बंद ठेवण्याचा निर्णय नागरिकांच्या बैठकीत घेण्यात आला. आंदोलनानंतरही रस्त्याच्या कामाला गती मिळाली नाही, तर बेमुदत शहर बंद व रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला.
पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणला जोडणाऱ्या सुरूर- पोलादपूर मार्गाच्या रुंदीकरण व सिमेंट काँक्रिटीकरणाच्या कामाला डिसेंबर २०२४ पासून सुरूर ते वाई या पहिल्या टप्प्याच्या कामाला सुरुवात झाली. या मार्गाचे सिमेंटीकरण सुरू असतानाच पसरणी घाटात मोऱ्या व संरक्षक भिंतीचे काम हाती घेण्यात आले. मात्र, ही कामे अपूर्ण असतानाच ठेकेदाराने पाचगणी- महाबळेश्वर या टप्प्याचे काम सुरू केले.
अनेक महिन्यांपासून सुरू असलेले हे काम अत्यंत संथ गतीने सुरू असल्याने पाचगणी ते महाबळेश्वर दरम्यानचा सुमारे २० किलोमीटरचा रस्त्याची बिकट अवस्था आहे. या पार्श्वभूमीवर सुरूर- पोलादपूर रस्त्यासह शहरातील विविध समस्यांवर चर्चा करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी जिल्हाप्रमुख राजेश कुंभारदरे यांनी पेटीट ग्रंथालयाच्या मैदानावर पक्षनिरपेक्ष नागरिक बैठक बोलावली होती.
Omkar Pawar IAS Success Story : एकदा नव्हे, दोनदा नव्हे तर तब्बल 4 वेळा अपयश! साताऱ्याचा ओमकार कसा झाला IAS? वाचा शेतकर्याच्या लेकाची यशोगाथाबैठकीस नगराध्यक्ष सुनील शिंदे, माजी नगराध्यक्ष डी. एम. बावळेकर, माजी नगराध्यक्षा विमलताई पार्टे, नगरसेवक संतोष शिंदे, अफजल सुतार, ॲड. संजय जंगम, नगरसेविका स्मिता पाटील, विशाल तोष्णीवाल, संदीप साळुंखे, रमेशभाई कौल, रमेश पलोड, गिरीश नायडू, नदीम शारवान, समीर सुतार, अतुल सलागरे, वृषाली डोईफोडे, लीलाताई शिंदे, यशवंत घाडगे, शंकर ढेबे, सविता पलोड, अमित ढेबे, उषाताई ओंबळे, राजश्री भिसे, मनीष तेजानी, रिचर्ड डायस, महेश गुजर, हेमंत साळवी, विजय नायडू, अंकित पलोड, योगेश बावळेकर, मेघा चोरगे, ज्योती वागदरे आदी मान्यवर उपस्थित होते.
या बैठकीत सोमवारी (ता. नऊ) नगरपालिका, तहसीलदार कार्यालय, वन विभाग, वीज वितरण कंपनी, सार्वजनिक बांधकाम विभाग व पोलिस ठाणे येथील प्रमुख अधिकाऱ्यांना मोर्चाने जाऊन नागरिकांच्या मागण्यांचे निवेदन देण्यात येणार आहे.