राज्यस्तरीय कॅरम स्पर्धेत साक्षी रामदुरकरला 'सुवर्ण'
esakal March 07, 2026 02:45 PM

28966

राज्यस्तरीय कॅरम स्पर्धेत
साक्षी रामदुरकरला ‘सुवर्ण’

सावंतवाडी, ता. ६ : चिपळूण-डेरवण (जि. रत्नागिरी) येथील श्री विठ्ठलराव जोशी चॅरिटीज ट्रस्टतर्फे आयोजित राज्यस्तरीय कॅरम स्पर्धेत १६ वर्षांखालील मुलींच्या गटात येथील मुक्ताई ॲकेडमीची खेळाडू साक्षी रामदुरकर हिने अजिंक्यपद पटकावले. या स्पर्धेत महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतून खेळाडूंनी सहभाग घेतला.
विठ्ठलराव जोशी चॅरिटीज ट्रस्टतर्फे गेली १२ वर्षे या स्पर्धांचे आयोजन केले जात आहे. मुक्ताई ॲकॅडमीचे विद्यार्थी गेल्या ९ वर्षांपासून सातत्याने यात यश संपादन करत आहेत. साक्षीने अंतिम फेरीत रत्नागिरीच्या स्वरा मोहिरे हिच्यावर सरळ दोन सेटमध्ये मात करून प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले. मान्यवरांच्या हस्ते तिला सुवर्ण, रोख रक्कम आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. साक्षी गेल्या चार वर्षांपासून मुक्ताई ॲकॅडमीचे अध्यक्ष व ज्येष्ठ कॅरम प्रशिक्षक कौस्तुभ पेडणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहे. या देदीप्यमान यशाबद्दल सर्वस्तरातून तिचे अभिनंदन होत आहे.
---
28965

मिलाग्रीस हायस्कूलचे
‘ऑलिंपियाड’मध्ये यश
सावंतवाडी, ता. ६ : ‘हमिंग बर्ड इंटरनॅशनल ऑलिंपियाड’च्या वतीने घेण्यात आलेल्या ‘स्पेल बी’ परीक्षेत येथील मिलाग्रीस हायस्कूलच्या सात विद्यार्थ्यांनी सुवर्णपदक, तीन विद्यार्थ्यांनी रौप्यपदक व पाच विद्यार्थ्यांनी कांस्यपदक प्राप्त केले. या परीक्षेसाठी प्रशालेतील पाचवी ते नववीमधून एकूण ६६ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना प्रशालेच्या इंग्रजी शिक्षिका श्रीमती दीपा वारंग यांनी मार्गदर्शन केले. यशस्वी विद्यार्थ्यांना प्रशालेचे मुख्याध्यापक फादर रिचर्ड सालदान्हा यांच्या हस्ते पदक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.