Marathi Actress Wedding: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमातून अनेक कलाकार प्रेक्षकांच्या घराघरात लोकप्रिय झाले. हास्य जत्रेमुळे अनेक नवोदित कलाकारांचे इंडस्ट्रीत नाव झाले. त्यांच्या स्क्रीन प्रेझेन्समुळे त्यांच्या वैयक्तिक आयुष्यबद्दलही प्रेक्षकांना कायम उत्सुकता असते. कलाकारही प्रेक्षकांना त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अपडेट्स देत असतात. अलीकडेच एक पोस्ट चर्चेत आली आहे, महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्री ईशा डे लवकरच लग्न करणार असून तिचे ग्रहमकाचे फोटो तिने सोशल मीडियावर टाकले आहेत. या फोटोची सध्या एकच चर्चा आहे.

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमात प्रेक्षकांना खळखळून हसवणारी अभिनेत्री ईशा डे लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. ईशाच्या घरी लग्न सराईला सुरुवात झाली असून लग्न पूर्वीचे विधी सुरू झाल्याचं कळतंय. तिने ग्रहमकाचा एक फोटो शेअर केला असून सुंदर निळ्या रंगाची साडी, मोत्याची माळ आणि कपाळांवर मुंडावळ्या बांधलेला फोटो तिने चाहत्यांसोबत शेअर केला आहे. इशा चा होणारा नवरा कोण आहे याकडेच हा त्यांचा लक्ष आहे.
View this post on Instagram
ईशा डे महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातून प्रेक्षकांना खळखळून हसवत आहे. या कार्यक्रमाने तिला प्रचंड लोकप्रियता दिली. हास्यजत्रेआधी या अभिनेत्रीने अय्या, गुलकंद या सिनेमांमध्ये भूमिका साकारल्या आहेत.
ईशाचं खरं नाव खरंतर इशा वडनेरकर असे आहे. पण ती लंडन स्कूल ऑफ ड्रामा मध्ये शिकायला होती तेव्हा जेव्हा जेव्हा ऑडिशन द्यायला जायची तेव्हा पंधरा मिनिटांचा स्लॉट असायचा. आपले उच्चार आणि त्यांचा उच्चार फार वेगळे आहेत. वडनेरकर नाव घेण्यात त्यांची पाच मिनिटे जायची त्यामुळे तिचे एक ट्यूटर होते त्यांनी तिला नाव बदलण्याचा सल्ला दिलेला. त्यानंतर ती ईशा डे असं तिचं नाव लावते.