नवरा असावा तर असा.. लग्नाच्या 15 व्या वाढदिवसानिमित्त 'पुष्पा'कडून पत्नीला कोट्यवधींची ही भेट
Tv9 Marathi March 08, 2026 06:45 PM

‘पुष्पा’ फेम अल्लू अर्जुनने नुकताच लग्नाचा 15 वा वाढदिवस साजरा केला. 6 मार्च 2026 रोजी अल्लू अर्जुन आणि स्नेहा रेड्डी यांच्या लग्नाला 15 वर्षे पूर्ण झाली. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील या लोकप्रिय जोडीने यानिमित्त सोशल मीडियावर पोस्ट लिहित एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव केला. परंतु लग्नाचा हा वाढदिवस अल्लू अर्जुनने पत्नीला दिलेल्या सरप्राइजमुळे आणखी चर्चेत आला. ‘स्टायलिश स्टार’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अल्लू अर्जुनने त्याच्या पत्नीला लग्नाच्या वाढदिवसानिमित्त अत्यंत आलिशान कार भेट म्हणून दिली. एक्स (ट्विटर) अकाऊंटवर त्याचा एक व्हिडीओ व्हायरल होत असून त्यामध्ये अल्लू अर्जुन त्याच्या पत्नीला मर्सिडीज- AMG CLE 53 भेट देताना दिसत आहे. या कारला अत्यंत सुंदररित्या सजविण्यात आलं होतं आणि त्यांच्या घराच्या गॅरेजमध्ये पार्क करण्यात आलं होतं.

अल्लू अर्जुन त्या कारची चावी पत्नीच्या हातात देत तिला लग्नाच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देतो. तेव्हा त्याचे वडील अल्लू अरविंद आणि अयान-अऱ्हा ही दोन्ही मुलं मागे आनंद व्यक्त करताना दिसतात. स्नेहासुद्धा ही महागडी भेट पाहून खुश होते आणि त्यानंतर अल्लू अर्जुनच्या गालावर किस करते. मर्सिडीज- AMG CLE 53 या मॉडेलची किंमत भारतात 1.5 कोटी ते 1.6 कोटी रुपयांदरम्यान आहे.

View this post on Instagram

A post shared by Allu Arjun (@alluarjunonline)

अल्लू अर्जुन आणि स्नेहा रेड्डी यांनी 6 मार्च 2011 रोजी लग्नगाठ बांधली होती. त्यांचा यावर्षीचा लग्नाचा वाढदिवस आणखी खास होता, कारण त्याच दिवशी अल्लू अर्जुनचा भाऊ अल्लू सिरीश याने नयनिका रेड्डीशी लग्न केलं. अत्यंत धूमधडाक्यात हा लग्नसोहळा पार पडला आणि त्याचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले. अल्लू अर्जुनची वहिनी नयनिका रेड्डी ही हैदराबादची असून ती एक बिझनेसवुमन आहे. नयनिकाच्या कुटुंबाचाही मोठा व्यवसाय आहे. तिचा फिल्म इंडस्ट्रीशी कोणताही संबंध नाही. त्याचप्रमाणे तिला फार लाइमलाइटमध्येही राहायला आवडत नाही.

अल्लू अर्जुन हा दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील अत्यंत लोकप्रिय आणि श्रीमंत कलाकार आहे. ‘पुष्पा’च्या दोन्ही चित्रपटांमुळे देशभरात त्याची लोकप्रियता वाढली. अल्लू अर्जुनकडे अत्यंत आलिशान आणि महागड्या गाड्यांचं कलेक्शन आहे. त्यात हमर H2, रेंज रोव्हर वोग SE, जॅग्वार XJ L, BMW X6, मर्सिडीज बेंझ GL 350 आणि मर्सिडीज बेंज CLA 200 यांचा समावेश आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.