तरंगेवाडी येथे विहिरीत पडून विवाहितेचा मृत्यू
esakal March 10, 2026 10:46 PM

विहिरीत उडी मारून
विवाहितेची आत्महत्या

सांगोला, ता. १० : सांगोला तालुक्यातील तरंगेवाडी येथे कौटुंबिक वादानंतर घरातून निघून गेलेल्या विवाहितेने विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी (ता. ५) उघडकीस आली. कालेश्वरी नवनाथ कोळेकर (वय २२) असे मृत विवाहितेचे नाव आहे. तिचा विवाह २०२३ मध्ये नवनाथ कोळेकर यांच्याशी झाला असून त्यांना दोन वर्षांचा मुलगा आहे. ४ मार्च रोजी रात्री किरकोळ वाद झाल्यानंतर ती घरातून निघून गेली होती. शोध घेत असताना प्रकाश कोळेकर यांच्या शेतातील विहिरीत तिचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.