Attack on Thackeray's Leader: हॉटेल बंद करून घरी जात असताना अज्ञातांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उप तालुका प्रमुख कृष्णा राठोड यांना अडवून त्यांच्यावर चाकू हल्ला केल्याची खळबळजनक घटना सोमवारी रात्री उशीरा घडली. शहराजवळील वाळूज औद्योगिक वसाहतीतील कामगार चौकात हा हल्ला झाला. अज्ञात हल्लेखोर फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
RTE Admissions: आरटीईच्या प्रवेशाला मुदतवाढ! ऑनलाईन पोर्टलवर आता पूर्वीच्या नियमांनुसारच होणार प्रवेश; हायकोर्टाचा लाखो विद्यार्थ्यांना दिलासाछत्रपती संभाजीनगरच्या वाळूज औद्योगिक वसाहतीत गुंडगिरीतून हल्ल्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. उद्योजकांना धमकावणे, त्यांच्याकडून खंडणी वसूल करणे अशा अनेक घटना यापूर्वी घडलेल्या आहेत. त्यातच काल मध्यरात्री कामगार चौकात हॉटेल चालक असलेल्या उद्धव ठाकरेंच्या पक्षाच्या उपतालुकाप्रमुखावर अज्ञातांनी चाकू हल्ला केला. यावेळी झालेल्या झटापटीत त्यांचा मित्रही जखमी झाला होता.
Maternity Leave: नोकरदार महिलांची कसरत आता थांबणार! 180 दिवसांची प्रसुती रजा मंजूर, तसंच वर्षभरापर्यंत...; सुनेत्रा पवारांची विधानसभेत घोषणावाळूज एमआयडीसी परिसरातील बजाजनगर येथील ही घटना आहे. उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे उपतालुका प्रमुख कृष्णा राठोड यांच्यावर मध्यरात्री चाकू हल्ला झाला. या हल्ल्यात त्यांच्यासोबत असलेला मित्र मन्नू राठोड हे देखील गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना सोमवारी रात्री सुमारे 12 वाजता कामगार चौक परिसरात घडली. या हल्ल्यात दोघे जण जखमी झाले असून त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
Minister Affairs: राजकारणात मोठी खळबळ; पत्नीचे मंत्र्यावर गंभीर आरोप; म्हणाल्या,'मी माझ्या पतीला दुसऱ्या महिलेसोबत आक्षेपार्ह अवस्थेत...'पोलिसांनी याप्रकरणात गुन्हा नोंद केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कृष्णा राठोड यांचे कामगार चौकात जय भवानी नावाचे हॉटेल आहे. रात्री हॉटेल बंद करून कृष्णा राठोड आणि त्यांचे सहकारी मन्नू राठोड हे चारचाकी वाहनाने घरी जात होते. कामगार चौकात पोहोचताच समोरून आलेल्या दुचाकीवरून तिघा अज्ञातांनी त्यांचा रस्ता अडवला.
यानंतर दोन्ही बाजूंमध्ये झटापट झाली. यादरम्यान अज्ञात आरोपींनी कृष्णा राठोड यांच्यावर चाकूने हल्ला केला. त्यांना वाचवण्यासाठी पुढे आलेल्या मन्नू राठोड यांच्यावरही आरोपींनी चाकूने वार केले. घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी तत्काळ मदत करत दोघांनाही छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. सध्या दोघांवर उपचार सुरू असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.