बिश्नोई गँगच्या नावाने खंडणी मागितली, सलग ५ दिवसांपासून जीवे मारण्याचा धमक्या; आरोपी असा अडकला जाळ्यात
Saam TV March 10, 2026 11:45 PM

मुंबईत खंडणी मागण्याचा प्रकार उघडकीस

आरोपीने स्वतःला लॉरेन्स बिश्नोई गँगचा सदस्य असल्याचे सांगून दिली धमकी

पोलिसांनी दिल्लीतून केली अटक

संजय गडदे, साम टीव्ही

मुंबईत लॉरेन्स बिश्नोई गँगच्या नावाने जीवे मारण्याची धमकी देत खंडणी मागणाऱ्या तरुणाला मालाड पोलिसांनी अटक केली आहे. तरुमाने ४५ वर्षीय बाबुलाल महावलाल अग्रवाल यांना धमकी दिली होती . मालाड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर आरोपी तरुणावर कारवाई करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीने बाबुलाल यांना २८ फेब्रुवारी ते ४ मार्च २०२६ दरम्यान तक्रारदार यांच्या मोबाईलवर अज्ञात मोबाईल क्रमांकावरून व्हॉट्सअॅप कॉल आणि मेसेज केले. त्याने स्वतःला लॉरेन्स बिश्नोई गँगचा सदस्य असल्याचे सांगत जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर पैशांची मागणी केली. याप्रकरणी बाबुलाल अग्रवाल यांनी मालाड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

मालाडपोलिसांनी तांत्रिक तपास करून मोबाईल क्रमांक आणि लोकेशनच्या आधारे आरोपीचा शोध घेतला. तपासादरम्यान २८ वर्षीय आरोपी फिरोज ओमप्रकाश अग्रवाल याला दिल्लीच्या संगम विहार परिसरातून ताब्यात घेतले.त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेले मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत.

Tuesday Horoscope : तुमच्या खांद्यावर नवीन जबाबदारी येणार; ५ राशींच्या लोकांसाठी मंगळवार ठरणार खास

सदर कारवाई अपर पोलिस आयुक्त (उत्तर प्रादेशिक) शशिकुमार मीना, पोलिस उपायुक्त परिमंडळ ११ संदीप जाधव, सहायक पोलिस आयुक्त गोराई विभाग विजय गिते (अति. प्रभारी), वरिष्ठ पोलिस निरीक्षक मालाड पोलिस ठाणे दुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

Ground Report : महायुद्धाची महाराष्ट्राला झळ; मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर... ४०० कंपन्या बंद होणार? जिल्हा जिल्ह्यात परिस्थिती काय?

तसेच तपास पथकात पोलीस निरीक्षक (गुन्हे) संजय कांबळे, पोलीस निरीक्षक विजय पाटील, पोलीस उपनिरीक्षक सालीनी शिंदे (सहाय्यक अधिकारी), पोलीस नाईक वाघचौर, पोलीस शिपाई सावंत, पोलीस शिपाई जगताप व इतर कर्मचाऱ्यांचा समावेश होता. अटक करण्यात आलेल्या आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले आहेत. कोर्टाने त्याला २५ मार्च २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास मालाड पोलीस करत आहेत.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.