रस्तासुरक्षा अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद
मुलुंड (बातमीदार) : वाहतूक नियमांविषयी जागरूकता वाढविण्यासाठी मुलुंड वाहतूक पोलिस विभाग, इफको टोकियो इन्शुरन्स आणि यशलोक फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी (ता. १६) रस्ता सुरक्षा अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. मुलुंड पूर्व येथील केळकर महाविद्यालयात आयोजित या कार्यक्रमात पदवीचे विद्यार्थी, शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. या कार्यक्रमाला मुलुंड वाहतूक विभागाचे प्रभारी पोलिस निरीक्षक महेश तांबे तसेच विभागातील इतर पोलिस कर्मचारी उपस्थित होते.