IPL 2026: 'विराट-रोहित सारखंच आहे', संजू सॅमसनचा प्रश्न विचारताच रियान पराग असं का म्हणाला?
Tv9 Marathi March 19, 2026 09:45 PM

आयपीएल 2026 स्पर्धेपूर्वी सर्वच फ्रेंचायझींनी आपल्या संघांची बांधणी केली आहे. राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्या मिनी लिलावापूर्वी ट्रेड विंडोतून देवाणघेवाण झाली होती. राजस्थान रॉयल्सने संजू सॅमसनला सोडत रवींद्र जडेजाला आपल्या संघात घेतलं आहे. त्यामुळे राजस्थान रॉयल्सने एकाच वेळी कर्णधार, विकेटकीपर आणि ओपनर फलंदाज गमावला आहे. असं असताना आयपीएल 2026 स्पर्धेत कर्णधारपदाची धुरा रियान परागच्या खांद्यावर असणार आहे. या पर्वापासून त्याच्या कर्णधारपदाचा खऱ्या अर्थाने कस लागणार आहे. मागच्या पर्वात काही सामन्यात त्याने कर्णधारपद भूषवलं होतं. पण यावेळी त्याच्यावर पूर्णपणे जबाबदारी असणार आहे. असं असलं तरी संजू सॅमसनची जागा भरून काढण्याचं आव्हान आहे. कारण तो संघाचा यशस्वी फलंदाज होता. त्यामुळे राजस्थान रॉयल्सपुढे मोठा पेच आहे. असं असताना रियान परागने त्याच्याबाबत आपलं स्पष्ट मत व्यक्त केलं आहे.

काय म्हणाला रियान पराग?

राजस्थान रॉयल्सने संजू सॅमसनच्या जागी रियान परागला कर्णधार म्हणून रिप्लेस केलं आहे. पण एक फलंदाज म्हणून त्याची रिप्लेसमेंट मिळाली आहे का? संघ असं करू शकतो का? असे एक ना अनेक प्रश्न क्रीडाप्रेमींना पडले आहेत. त्यामुळेच रियान परागला या प्रश्नांचा सामना करावा लागला. नवं पर्व सुरू होण्यापूर्वी रियान पराग पत्रकार परिषदेला सामोरं गेला. यावेळी संजू सॅमसनच्या रिप्लेसमेंटबाबत स्पष्ट मत मांडलं. ‘संजू सॅमसन बाबत बोलायचं तर आम्ही असा काही विचार करत नाही की त्या खेळाडूला रिप्लेस करायचं आहे. आम्ही फार फार तर त्या स्किलचा खेळाडू शोधू किंवा त्या नंबरवर फलंदाजी करू. पण विराट कोहली आणि रोहित शर्माची रिप्लेसमेंट नाही, तसंच संजू सॅमसनबाबत आहे. त्याची रिप्लेसमेंट नाही. तो चांगला खेळाडू आहे.’

VIDEO | Rajasthan Royals captain Riyan Parag, speaking at the IPL 2026 pre-season press conference, says Sanju Samson is irreplaceable and stresses the team’s focus on better planning and finishing games this season.

He says, “We never thought of replacing him (Sanju Samson).… pic.twitter.com/n9HuGqJ0DH

— Press Trust of India (@PTI_News)

संजू सॅमसन आणि राजस्थान रॉयल्स

संजू सॅमसनने राजस्थान रॉयल्ससाठी 11 पर्वात खेळला आहे. त्याने या दरम्यानं 150 सामने खेळले असून 4 हजाराहून अधिक धावा केल्या आहेत. राजस्थान रॉयल्ससाठी सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. त्याच्या नेतृत्वात राजस्थान रॉयल्सने 14 वर्षानंतर म्हणजेच 2008 नंतर 2022 साली अंतिम फेरी गाठली होती. पण चेन्नई सुपर किंग्सकडून पराभवाचं तोंड पाहावं लागलं होतं. आता रियान परागच्या नेतृत्वात राजस्थानचा संघ मैदानात उतरणार आहे. यंदा तरी जेतेपदाचं स्वप्न पूर्ण होणार का? हा प्रश्न आहे. राजस्थानचा संघ इतर संघाच्या तुलनेत कमकुवत वाटतो.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.