माशी शिंकली…! IPL 2026 ला सुरुवात होण्यापूर्वीच CSK च्या स्टार खेळाडूने माघार घेतली, दुखापतीमुळे संपूर्ण हंगामाला मुकणार
esakal March 19, 2026 09:45 PM

Nathan Ellis injury IPL 2026 CSK replacement options: चेन्नई सुपर किंग्सला इंडियन प्रीमिअर लीगचे १९ वे पर्व सुरू होण्यापूर्वीच मोठा धक्का बसला आहे. आयपीएल २०२६ च्या पहिल्या लढतीत CSKला राजस्थान रॉयल्सचा सामना करावा लागणार आहे. मथिशा पथिराणा याला लिलावात आधीच गमावल्यामुळे CSK ची गोलंदाजी कमकुवत वाटत होती, त्यात आता ऑस्ट्रेलियन जलदगती गोलंदाज नॅथन एलिस याने दुखापतीमुळे स्पर्धेतून माघार घेतली आहे. ३१ वर्षीय गोलंदाजाला हॅमस्ट्रिंग दुखापत झाली आहे आणि तो निर्धारित वेळेत पूर्णपणे तंदुरुस्त होऊ शकणार नाही.

"हा आमच्यासाठी मोठा धक्का आहे. नॅथन एलिस हा आमचा महत्त्वाचा गोलंदाज आहे, विशेषतः अखेरच्या षटकांमध्ये, तो प्रभावी मारा करू शकतो. आम्ही त्याच्या जागी नवीन खेळाडूंचा शोध घेत आहोत,” असे CSKचे सीईओ के. एस. विश्वनाथन यांनी गुरुवारी 'स्पोर्टस्टार'ला सांगितले. २०२२ पासून ऋतुराज गायकवाडचा हा संघ डेथ ओव्हरमध्ये मथिशा पथिराणावर विसंबून होते, परंतु मागील पर्वातील निराशाजनक कामगिरीमुळे फ्रँचायझीने श्रीलंकन गोलंदाजाला रिलिज केले.

खेळाडूंचे कल्याण, हक्कांच्या बाबतीत आयपीएल ही जगातील सर्वोत्तम ट्वेंटी- २० लीग नाही! WCA चा धक्कादायक अहवाल, नव्या लीग टॉपर...

चेन्नई सुपर किंग्सने २ कोटींच्या मुळ रकमेत ऑसी गोलंदाजाला संघात कायम राखले. एलिसने मागील पर्वात १ सामन्यात १ बळी घेतला होता. त्याआधी तो पंजाब किंग्सकडून पाच पर्व खेळला आणि त्यात १८ विकेट्स घेतल्या होत्या. आता संघातील परदेशी खेळाडू येत्या काही दिवसांत आयपीएलसाठी भारतात दाखल होतील. पश्चिम आशियात सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे यूएई आणि कतार मार्गे येणाऱ्या विमानसेवांवर परिणाम झाला आहे आणि त्यामुळे परदेशी खेळाडू येण्यास विलंब होतोय. अफगाणिस्तानचा नूर अहमद भारतात दाखल झाला आहे आणि जेमी ओव्हरटन चेन्नईत आज रात्री येणे अपेक्षित आहे.

डेवॉल्ड ब्रेव्हिस, मॅट हेन्री, झॅक फॉल्कस आणि मॅथ्यू शॉर्ट हे २२ मार्च रोजी संघात दाखल होतील. सुपर किंग्सने त्यांचा स्टार खेळाडू महेंद्रसिंग धोनीसह १ मार्चपासून सरावाला सुरुवात केली आहे.

IPL 2026: मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांचा संताप, तिकिटांच्या किमती पाहून चक्रावले; मागील पर्वात ११०० ला मिळणारं तिकिट आता...

चेन्नई सुपर किंग्स - ऋतुराज गायकवाड (कर्णधार), आयुष म्हात्रे, डेवाल्ड ब्रेव्हिस, महेंद्रसिंग धोनी, उर्विल पटेल, संजू सॅमसन, शिवम दुबे, जॅमी ओव्हर्टन, रामकृष्ण घोष, नूर अहमद, खलील अहमद, अंशुल कंबोज, गुर्जपनीत सिंग, नॅथन एलिस, श्रेयस गोपाळ, मुकेश चौधरी, कार्तिक शर्मा , प्रशांत वीर, राहुल चाहर, मॅट हेन्री, अकिल हुसैन, मॅथ्यू शॉर्ट , झॅक फॉक्स , सर्फराज खान, अमन खान.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.