सध्या देशात सर्वत्र एलपीजी गॅस सिलिंडरच्या टंचाईचा माहोल आहे. देशात सर्वत्र एजन्सी समोर रिकामे सिलिंडर घेऊन लोकांच्या रांगा लागल्या आहेत. मात्र, या संकटाच्या समयी काही जण घरगुती सिलिंडरचा काळाबाजार करत आहेत. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे के.सी.सेंथील राजन यांनी या संदर्भात मोठा इशारा दिला आहे. आज काल लोकांना मोबाईलवर गॅस बिलाच्या APK फाईलच्या नावाने फसवणूक करणारे संदेश येत आहेत. याद्वारे तुमच्याकडे बँकेचे डिटेल्स मागितले जात आहेत.आणि लोक आपले ओटीपी देऊन फसत आहेत. त्यांची बँक खाती क्षणात रिकामी होत आहेत. जर तुम्हाला देखील असे मॅसेज आले असतील तर तातडीने पोलिसांकडे तक्रार नोंदवा असे सरकारने म्हटले आहे.
इंधन पुरवठ्या संदर्भात पेट्रोलियम मंत्रालयाचे संयुक्त सचिव सुजाता शर्मा यांनी स्पष्ट केले आहे की पेट्रोल पंपावरील संपू दिले जाणार नाही. सरकारने याची संपूर्ण तयार केली आहे की पेट्रोलची टंचाई भासू नये. तसेच मिनिस्टी ऑफ शिपिंगचे विशेष सचिव राजेश के. सिन्हा आणि परराष्ट्र मंत्रालयाचे रणधीर जायसवाल हे देखील परदेशातील येणाऱ्या पुरवठ्याच्या संपूर्ण स्थितीवर नजर ठेवून आहेत.
सात दिवसात पीएनजी कनेक्शनसरकारने आता एलपीजी म्हणजे घरगुती गॅसचा वापर कमी व्हावा आणि पीएनजी ( पाईप नेचरल गॅस ) वापर वाढावा यासाठी प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे असीम महाजन यांनी सांगितले की व्यावसायिक ग्राहकांना विनंती केली जात आहे की त्यांनी लवकरात लवकर पीएनजीवर शिफ्ट व्हावे. चांगली बातमी म्हणजे गेल्या आठवड्यात पीएनजीचे १.२५ लाख नवीन कनेक्शन दिले गेले आहेत. सरकारने आदेश दिले आहेत की पीएनजी गॅससाठी येणाऱ्या अर्जांवर एक आठवड्यात मंजूरी देण्यात यावी.
२८ लाख लोक सुरक्षित भारतात परतले२८ फेब्रुवारी ते आतापर्यंत आखातात अडकलेले २८ लाख लोक सुरक्षित भारतात परतले आहेत. कुवैतचा हवाई मार्ग २८ फेब्रुवारी पासून बंद आहे. त्यामुळे तेथे अडकलेल्या भारतीयांबाबत चिंता व्यक्त होत आहे. मात्र, आता एक दिलासा आहे की जझीरा एअरवेज सौदी अरबच्या मार्गाने स्पेशल उड्डाणे चालवत आहे. उद्या कोच्ची साठी पहिले स्पेशल विमान उड्डाण घेणार आहे.त्यामुळे केरळातील लोक भारतात पुन्हा येतील.