Rupali Chakankar: सोमवती अमावस्येच्या दिवशी रुपाली चाकणकर कुठे होत्या? सुषमा अंधारेंच्या आरोपावर दिलं स्पष्टीकरण
Saam TV March 21, 2026 02:45 PM
Summary -
  • सुषमा अंधारे यांच्या आरोपांना रुपाली चाकणकर यांचे प्रत्युत्तर

  • सोमवती अमावस्येच्या आरोपांवर दिले स्पष्टीकरण

  • आरोप खोटे असल्याचा दावा त्यांनी केला

  • आरोप करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला

नाशिकच्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर टीकेच्या धनी झाल्या आहेत. या प्रकरणात त्यांच्यावर विरोधकांकडून जोरदार टीका सुरू आहे. याप्रकरणात रुपाली चाकणकर यांनी शुक्रवारी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. रुपाली चाकणकर यांच्यावर शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी पुरावे दाखवत अनेक आरोप केले. रुपाली चाकणकर या तंत्र-मंत्र विद्या करायच्या. वशीकरणाची विद्या शिकण्यासाठी त्यांनी २ सप्टेंबर २०२४ रोजी सोमवती अमावस्येच्या दिवशी स्वत:ची अनामिका कापली होती, असा आरोप सुषमा अंधारे यांनी केला होता. सुषमा अंधारे यांच्या आरोपाला रुपाली चाकणकर यांनी उत्तर देत त्या २ सप्टेंबरच्या दिवशी कुठे होत्या हे सांगितले.

रुपाली चाकणकरयांनी २ सप्टेंबरला त्या कुठे होता याबद्दल सांगितले की, 'गेल्या दोन दिवसांपासून ज्या गोष्टी चालू आहेत त्या चुकीच्या आहेत. मी पहिल्याच दिवशी सांगितलं होतं की आम्ही संस्थानाशी जोडलेलो होतो. पाद्यपूजेचे जे फोटो आहेत ते अनेक वर्षांपूर्वीचे आहेत. अनेक लोकांचे फोटो यामध्ये आहेत. पण फक्त महिला म्हणून ज्या पद्धतीचं 'सॉफ्ट टार्गेट' गेल्या दोन दिवसांमध्ये करतायत ते अत्यंत चुकीचं आहे. कोणीतरी २ सप्टेंबरचा फोटो दाखवला, पण तो १२ सप्टेंबरचा आहे. २ सप्टेंबरला मी अजितदादांच्या दौऱ्यात होते.'

Rupali Chakankar controversy : रूपाली चाकणकर काळी जादू करायच्या, अनामिका कापली; सुषमा अंधारेंनी सांगितलं सोमवती 'अमावस्या' कनेक्शन

तसंच, सुषमा अंधारे यांनी रुपाली चाकणकर यांनी अमावस्येच्या दिवशी अनामिका कापल्याचा आरोप त्यांच्यावर केला होता. त्यावर उत्तर देताना रुपाली चाकणकर यांनी त्यांच्यावर आरोप करणाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाई करेल असे सांगितले. त्या म्हणाल्या की, 'माझ्या हाताला कुठेही जखम नव्हती. खोटे नरेटिव्ह सेट करणाऱ्यांच्या विरोधात कायद्याच्या चौकटीतून प्रक्रिया नक्की करेल.' रुपाली चाकणकर यांनी अशोख खरातविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

Rupali Chakankar video : संतापजनक! चाकणकरांचा पराक्रम; भोंदू बाबा खरातची विठ्ठलाशी तुलना, अध्यक्षपद केलं अर्पण

रुपाली चाकणकर यांनी पुढे असेही सांगितले की, 'आपण काही लोकांवर विश्वास ठेवतो, आपली अध्यात्मिक भावना असते. माझं संपूर्ण कुटुंब हे वारकरी संप्रदायातील आहे. आमची खरातवर असणारी श्रद्धा अध्यात्मिक दृष्टीकोनातून होती. त्यामुळे खरातच्या ट्रस्टसोबत आम्ही जोडले गेले. पण खरातची दुसरी बाजू मला माहिती नव्हती. जे काही कृत्य घडलंय ते अत्यंत चुकीचं आणि घाणेरडं आहे. त्याचे आम्ही कुठेही समर्थन करणार नाही. पोलिसांनी त्याचा तपास करुन आरोपीवर कठोर कारवाई करावी. पण एक महिला म्हणून माझ्यावर जे आरोप केले जात आहेत ते खूपच वाईट आहेत.'

Rupali Chakankar: अशोक खरातला गुरू का अन् कसं मानलं? रुपाली चाकणकरांनी सर्वकाही सांगितलं
© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.