कृषी तज्ज्ञ डॉ. जयंतराव पाटील यां जन्मशताब्दी सोहळा
esakal March 21, 2026 10:45 PM

कृषितज्ज्ञ डॉ. पाटील यांच्या जन्मशताब्दी सोहळ्याचे आयोजन

बोर्डी, ता. २१ (बातमीदार) : आदिवासी व ग्रामीण विकास तसेच कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे ज्येष्ठ समाजसेवक डॉ. जयंतराव पाटील यांच्या जन्मशताब्दी वर्षाचा शुभारंभ येत्या रविवारी (ता. २९) बोर्डी येथील सुपेह हायस्कूल माजी विद्यार्थी संघाच्या एस. आर. सावे शिबिर निवास (कॅम्पिंग ग्राउंड) येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार हितेंद्र ठाकूर उपस्थित राहणार असून, पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असतील.
याप्रसंगी आमदार मनीषा चौधरी, विनोद निकोले, मुस्ताक अंतुले, वसई-विरार पालिकेचे महापौर अजीव पाटील तसेच ज्येष्ठ साहित्यिक मिलिंद बोकील हे उपस्थित राहणार आहेत. तसेच डॉ. जयंतराव पाटील यांनी आदिवासी ग्रामीण समाजाच्या शेती व सर्वांगीण विकासासाठी केलेल्या कार्याचा गौरव या वेळी करण्यात येईल. डॉ. पाटील यांच्या विचारांची प्रेरणा पुढील पिढीपर्यंत पोहोचवणे हा या उपक्रमाचा उद्देश असल्याची माहिती जन्मशताब्दी वर्ष समारोह समितीचे अध्यक्ष नरेश राऊत यांनी या वेळी दिली.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.