टाकरवण: शेताच्या बांधावर उभं राहून जेव्हा ज्ञानेश्वर गाडे आपल्या हिरव्यागार टरबुजाच्या वेलांकडे पाहतात, तेव्हा त्यांच्या डोळ्यात कौतुकाऐवजी चिंतेची ढग गडद होतात. गेल्या तीन-चार महिन्यांपासून रक्ताचं पाणी करून, रात्रंदिवस एक करून त्यांनी हे पीक फुलवलं होतं.
निसर्गानेही सुरवातीला साथ दिली, फळं टपोरी झाली आणि पदरात चार पैसे पडतील अशी आशा निर्माण झाली. पण नियतीला काही वेगळंच मान्य होतं. ऐन तोडणीच्या वेळी आकाशात काळ्या ढगांनी गर्दी केली आणि टाकरवण परिसरातील शेकडो शेतकऱ्यांच्या वर्षभराच्या कष्टावर पाणी फेरलं गेलं.
गेल्या चार-पाच दिवसांपासून सुरू असलेल्या ढगाळ वातावरणामुळे आणि अवकाळी पावसाच्या धास्तीने टरबूज उत्पादक शेतकरी सध्या मोठ्या आर्थिक कोंडीत सापडला आहे.
टाकरवण आणि परिसरातील बहुतांश शेतकऱ्यांनी यंदा पारंपरिक शेतीला फाटा देत टरबूज, खरबूज आणि विविध फळभाज्यांची मोठ्या आशेने लागवड केली होती. आधुनिक तंत्रज्ञान, पाण्याची योग्य व्यवस्था आणि प्लॅस्टिक मल्चिंगचा वापर करून दर्जेदार उत्पादन घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, निसर्गाच्या लहरीपणाचा फटका थेट बाजारपेठेला बसला आहे.
वातावरणात गारवा निर्माण झाल्याने आणि पाऊस सुरू झाल्याने थंड फळांची मागणी एकदम घटली आहे. याचा परिणाम असा झाला की, ज्या टरबुजाची चव चाखायला ग्राहक उन्हाळ्यात गर्दी करायचे, तेच टरबूज आता बाजारात पडून आहेत.
Beed News: अजिंठा डोंगररांगेत निसर्गाचे १४ नवीन झरे शोधले; १९१०च्या ब्रिटिश नकाशातील दोन झरे अजूनही जिवंत विक्रीसाठी रस्त्यावरb बसण्याची वेळशेतातून तोडलेला माल घेण्यासाठी व्यापारी फिरकत नसल्याने, हतबल झालेल्या शेतकऱ्यांना आपला माल आठवडी बाजारात रस्त्यावर बसून विकावा लागत आहे. ढगाळ वातावरणामुळे ग्राहकांचा प्रतिसाद अत्यंत कमी असून, ताजी टरबुजे रस्त्यावरच खराब होण्याची भीती निर्माण झाली आहे.
वरिष्ठांच्या छळाला कंटाळून अधिकाऱ्याचं टोकाचं पाऊल, निवृत्तीला उरलेले फक्त दहा दिवस; काय घडलं? शेती नेमकी कशी करावी आणि जगावे कसे?पावसाच्या तडाख्यातून वाचलेले टरबूज कसेबसे बाजारात विक्रीसाठी आणले आहेत, पण गिऱ्हाईकच नसल्याने फळांना मागणी नाही. कोणतेही पीक घेतले तरी त्याला योग्य भाव मिळत नसल्याने शेती नेमकी कशी करावी आणि जगावे कसे, असा प्रश्न आमच्यासमोर उभा ठाकला आहे, अशी आर्त हाक शेतकरी ज्ञानेश्वर गाडे यांनी दिली आहे.
खर्चाचा आकडा आणि तोट्याची झळटरबूज शेतीसाठी पाण्याची व्यवस्था, मजुरी, खत-औषधे आणि प्लॅस्टिक मल्चिंग असा एकरी ५० ते ६० हजार रुपये खर्च येतो. हा उत्पादन खर्च निघण्यासाठी किमान १० रुपये किलोचा भाव मिळणे आवश्यक असते. मात्र, सध्या केवळ ४ ते ५ रुपये भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांचा वाहतूक खर्चही खिशातून जात आहे.
उत्पादकांना फटकाबाजारपेठेतील गणितंही तितकीच भयावह आणि शेतकऱ्याच्या मुळावर येणारी आहेत. व्यापारी हमीद बागवान यांनी दिलेल्या माहितीनुसार, अवकाळी वातावरण तयार होण्यापूर्वी, म्हणजे अवघ्या पंधरा दिवसांपूर्वी, बाजारपेठेत टरबुजाला प्रति किलो ८ ते ९ रुपये असा समाधानकारक भाव मिळत होता. मात्र, जसे ढग घोंगावू लागले आणि पावसाची शक्यता वाढली, तसे भाव थेट ४ ते ५ रुपयांपर्यंत खाली कोसळले आहेत. मागणी घटल्यामुळे व्यापाऱ्यांनीही खरेदीचा हात आखडता घेतला आहे, ज्याचा थेट फटका उत्पादकाला बसत आहे.