Beed News: अजिंठा डोंगररांगेत निसर्गाचे १४ नवीन झरे शोधले; १९१०च्या ब्रिटिश नकाशातील दोन झरे अजूनही जिवंत
esakal March 22, 2026 03:45 PM

सिल्लोड: ‘पाणी म्हणजे जीवन’ ही उक्ती सार्थ ठरवणारे निसर्गाचे अनेक चमत्कार आपल्या अवतीभोवती दडलेले आहेत. जागतिक जल दिनाच्या निमित्ताने सिल्लोड तालुक्यातील अशाच नैसर्गिक आणि शाश्वत जलस्रोतांची (झरे) रंजक माहिती समोर आली आहे. १९१० मध्ये ब्रिटिशांनी शोधलेल्या दोन जिवंत झऱ्यांच्या ऐतिहासिक नोंदींसह, आता पर्यावरण अभ्यासक डॉ. संतोष पाटील यांनी जिल्ह्यात आणखी १४ नवीन नैसर्गिक झरे शोधून काढले आहेत. निसर्गाचे हे ‘अमृतकुंभ’ आजही वन्यजीव आणि जैवविविधतेसाठी संजीवनी ठरत आहेत.

ब्रिटिश काळात १९१० मध्ये ‘ग्रेट ट्रायग्नोमेट्रिक सर्व्हे ऑफ इंडिया’ या संस्थेने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील १३ नैसर्गिक झऱ्यांचा शोध घेऊन त्यांची नोंद केली होती. या सर्वेक्षणाचे विशेष नकाशे (टोपोशीट) तयार करण्यात आले होते.

Walking Benefits: फक्त 1 किमी चालण्याची सवय लावा! शरीरात होणारे बदल पाहून तुम्हीही चकित व्हाल

यामध्ये सिल्लोड तालुक्यातील उत्तरेस असलेल्या अजिंठा डोंगररांगेतील वडाळी गावाजवळील दोन जिवंत झऱ्यांचा ‘स्प्रिंग’ म्हणून उल्लेख करण्यात आला आहे. ही ऐतिहासिक नोंद आजही या झऱ्यांच्या शाश्वततेची साक्ष देते.

Maharashtra News: अवघ्या दोनशे रुपयांत होणार जमिनींचे पोटहिस्से, मोजणी फीमध्ये सवलत; राज्य भूमी अभिलेख विभागाचा निर्णय दिवसाला ४० हजार लिटर पाण्याचे दान

डॉ. पाटील यांनी केलेल्या मोजणीनुसार, फेब्रुवारी महिन्यात पिंपळदरी येथील एका मोठ्या झऱ्यातून दर मिनिटाला ३० लिटर पाणी बाहेर येत होते. म्हणजेच एका तासाला १,८०० लिटर आणि दिवसाला सुमारे ४० हजार लिटर पाणी हा एकच नैसर्गिक झरा निर्माण करतो. हे पाणी कोणत्याही पंपाशिवाय जमिनीतून प्रवाहित होऊन शेकडो झाडे आणि वन्यजीवांची तहान भागवत आहे. या झऱ्यांची माहिती आता भूजल सर्वेक्षण विभागाला देण्यात आली असून, त्यांचे संवर्धन करणे काळाची गरज बनली आहे.

नव्या १४ झऱ्यांचा शोध

शासकीय भूजल सर्वेक्षण विभागाला मदत व्हावी, या उद्देशाने डॉ. संतोष पाटील यांनी सखोल अभ्यास करून जिल्ह्यात आणखी नवीन झरे शोधले आहेत. यामध्ये पिंपळदरी येथील डोंगरातील इसगिराचे २ झरे, बाळापूर येथील भवरेश्वर, मुर्डेश्वरचे ऋषीकुंड, वाघरा, अजिंठा, निल्लोड आणि पालोद येथील गायमुख झऱ्यांचा समावेश आहे. याशिवाय जिल्ह्यातील देवदरी, वनदेव, शिपघाट, लिंगदरी, बनोटी आणि पूर्णा नागेश्वर अशा एकूण १४ नवीन स्रोतांची माहिती त्यांनी संकलित केली आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.