Iran War Live Update: इराणने शनिवारी रात्री दक्षिण इस्रायलमधील दिमोना शहरावर बॅलिस्टिक क्षेपणास्त्र हल्ला केला, ज्यात 100 हून अधिक लोक जखमी झाले. दिमोना हे इस्रायलच्या अणुकार्यक्रम केंद्राचे ठिकाण आहे. इराण अणुस्थळांवर नतान्झवर इस्त्रायल आणि अमेरिकेनं हल्ला केल्यानंतर इराणने अवघ्या काही तासात पलटवार करत जशास तसे प्रत्युत्तर दिलं आहे. दिमोना आणि अरादमधील हल्ल्यानंतर इस्त्रायलमधील सर्वात भयाण रात्र ठरली. पीएम बेंजामिन नेत्यानाहू यांनी ही कठिण संध्याकाळ असल्याची प्रतिक्रिया दिली. या हल्यानंतर इस्त्रायली जनतेमध्ये दहशत पसरली असून एका महिलेनं थेट राष्ट्रीय सुरक्षा मंत्र्यासमोर आपला आक्रोश व्यक्त केला.
अरादमध्ये शक्तीशाली मिसाईलने हाहाकार करताच इस्त्रायली महिलेच्या संतापाच उद्रेक झाला. इस्रायलचे 'राष्ट्रीय सुरक्षा' मंत्री इतामार बेन ग्विर यांच्यासमोर आक्रोश करत तेथून जाण्यासाठी भाग पाडलं. या सर्व मृत्यूंना तुम्हीच जबाबदार आहात, आमच्या शहरातून चालते व्हा; इथे तुम्हाला काहीही स्थान नाही, हे नवीन नाझी, अशा शब्दात आपला संताप व्यक्त केला.
#BREAKING
— Tehran Times (@TehranTimes79) March 22, 2026
Tension in Arad: Settlers attack Israeli 'National Security' Minister Itamar Ben Gvir and expel him.
“You are responsible for all this death... Get out of our city, you have no place here, you new Nazi!” pic.twitter.com/3ecDpIIXjS
दरम्यान, इस्रायलच्या आर्मी रेडिओनुसार, दिमोना आणि अराद येथील हल्ल्यानंतर 150 जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. इस्रायलमधील हल्ल्यानंतर त्या सर्वांना उपचारासाठी सोरोका रुग्णालयात नेण्यात आले. जखमींची प्रकृती आणि हल्ल्यामुळे झालेल्या एकूण नुकसानीची माहिती अद्याप पूर्णपणे उपलब्ध नाही.
एका इस्रायली शांतता कार्यकर्त्याने आणि नेत्याने दिमोना आणि अराद येथील इराणी हल्ल्यानंतर सरकारकडे उत्तरांची मागणी केली आहे. 'पीस नाऊ' या संस्थेशी संबंधित असलेल्या यारीव ओपेनहायमर यांनी 'एक्स' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक निवेदन जारी केले आहे, ज्यात म्हटले आहे की सरकार इराणच्या लष्करी क्षमतेबद्दल अचूक माहिती देत नाही. ते म्हणाले की, यापूर्वी इराणची शस्त्रे संपत असल्याचा दावा करण्यात आला होता, परंतु अलीकडील हल्ल्यांमुळे या दाव्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ओपेनहायमर यांनी सरकारवर आरोप केला आहे की, इराणच्या अलीकडील हल्ल्यांविरुद्ध इस्रायलची इंटरसेप्टर प्रणाली का अयशस्वी ठरली, हे सरकार जनतेला सांगत नाही.
JUST IN: 🇮🇱🇮🇷 Drone footage shows the destruction in Israel following Iranian ballistic missile strike. pic.twitter.com/jtmojnYXB3
— BRICS News (@BRICSinfo) March 21, 2026
ते म्हणाले, "इस्रायलवर किती क्षेपणास्त्रे डागण्यात आली, त्यापैकी किती लक्ष्यांपर्यंत पोहोचली, किती लाँचर्स नष्ट करण्यात आले आणि शत्रूकडे अजून किती क्षेपणास्त्रे आणि लाँचर्स शिल्लक आहेत, हे आम्हाला सांगितले जात नाही." इराणने दिमोना आणि अरादवर केलेल्या हल्ल्यांनंतर हे विधान आले आहे, ज्यात मुलांसह 100 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. दुसऱ्या एका पोस्टमध्ये ते म्हणाले, "जनतेची दिशाभूल करणे थांबवा आणि सत्य सांगा."
इस्रायली लष्कराने इराणकडून दक्षिण इस्रायलला लक्ष्य करून केलेल्या आणखी एका बॅलिस्टिक क्षेपणास्त्र हल्ल्याची ओळख पटवली आहे. यासह, इराणने आज (22 मार्च) गेल्या तासाभरात इस्रायलवर तीन बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या