लष्करेअझीम चीफ आफ डिफेन्स फोर्सिस ऑफ सरजमीं-ए-पाकिस्तान, मियां आसिफ मुनीरसाहब, फिलहाल आपण जानत असाल की ईरान आणि अमरिका और इस्रईल के दरमियां जंग जारी आहे. या जंगमुळे सरजमीं-ए-पाकिस्तानमध्ये खूब गोंधळ माजला आहे.
अवामच्या पेटमध्ये भूख आहे, आणि जेबें खाली! टमाटिर पांचसौ रुपैय्या किलो झाले आहेत. पाकिस्तानातील हरेक आदमी घरी बेगमेची बोलणी खात जगत आहे. पेट्रोल पंप सूखे पडत चालले आहेत. परवाच एका पंपावर एक शख्स पापड बेचताना मी बघितला. मी म्हटले, ‘बर्खुर्दार, जहां पट्रोल नहीं, वहां पापड बेच रहे हो? यह क्या नौबत आई’ तर तो म्हणाला, ‘मैंही इस पंप का मालिक हूं!’ जानेदो.
एक जंगी स्ट्रॅटेजी सुचवण्यासाठी कोड लँग्वेजमध्ये तुम्हाला हे खत लिखत आहे. मराठी कोड लँग्वेज आहे, कोणीही पढणार नाही, आप टेन्शन न लें!! ही जुबान महाराष्ट्रातही कोणी नीट वापरत नाही, असे मला समझले आहे.
जंगी स्ट्रॅटजी अशी की अमरिका किंवा इस्रईलने पाकिस्तानवर हमला केला तर आपण सीधे दिल्ली आणि बाँम्बेवर अणुबाँम्ब टाकायचा! दुसरा काही इलाजच नाही. बहरहाल हालत तो अशी आहे की इंडिया हा आपला बाय डिफॉल्ट दुश्मन आहे. बॉम्बेवर अणुबॉम्ब टाकणे तसे सोपे आणि सस्ते आहे. कराचीहून बॉम्बे तशी नजदीक पडते. अर्ज किया है...
पलट दूंगा सारी दुनिया ऐ मेरे जानिब,
बस ये रजाई हटाने की बाजूओं में ताकद दे दे!
...आपका क्या मशवरा है? फर्माइए. आपका अपना, अब्दुल बसीत (किसी जमाने का हाई कमिश्नर, इंडिया)
ताजा कलम : यही खत मैं वझीरे आजम मियां शहाबाज शरीफ को भेजनेवाला था. लेकिन उन्होने कहा की कहो फकीर की, सुनो मुनीर की! मैं यही करता हूं, आप भी वही करो. शुक्रिया!
जनाब अब्दुल बसीतसाहब, आपण सरजमीं-ए-काफर हिंदुस्तानात हाय कमिश्नर होता, याचा तआज्जुब वाटला. येत्या आठ दिवसांत पाकिस्तानात एक बूंद पट्रोल राहणार नाही. कतारने त्यांचा पेट्रोल पंप बंद केला आहे. महंगाई जोरपर है और जंग की हालात की वजह से पाकिस्तान की हव्वा भी टाइट है! सुनिये...
जिन्हे कोयल समझा वो कौव्वा निकला,
जिन्हे दोस्त समझा वो हव्वा निकला,
जो रोका करते ते हमें पीने से,
उनकी जेब से पव्वा निकला!
...ही पाकिस्तानची हालत आहे. बॉम्बेवर अटम बम टाकण्याची जुबान चालवू नका. आपल्याकडचे साधे ईद-दिवाळीचे फटाके नीट फुटत नाहीत. फटाके फुसके निघाल्यामुळे यावेळी मी वर्ल्डकप क्रिकेटमध्ये जिंकू नका, असा मशवरा आपल्या क्रिकेट टीमला दिला होता. त्यांनी ऐकला! मरेस्तवर मार खाऊन आले, मी त्यांना शाबाशकी दिली. याला म्हणतात मुल्क के लिए इमानदारी! बॉम्ब कसे टाकताय?
माझा तुम्हाला मशवरा असा आहे की तो काफरांनी बनवलेला ‘धुरंधर’ सिनेमा बघून फालतू बकबक करु नका. ‘धुरंधर’ बघितल्यामुळे अनेकांचा दिमाग ढिला झाला आहे. यहां भी, वहां भी! धुरंधर बघितल्यामुळेच तुम्हाला हे विचार-इ-भलते सुचतात.
ये नया इंडिया है, घुसेगा भी मारेगा भी! हे किती वेळा ऐकून घ्यायचे? अपना लगाम-ए-जीभ खींच लो! बडी बडी बातें, वडा पाव खाते!! चूप रहो!! असीम मुनीर (चीफ ऑफ डिफेन्स फोर्सेस, पाकिस्तान)