नाशिक : नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात (Ashok Kharat) प्रकरणाच्या तपासात अनेक धक्कादायक खुलासे समोर येताना दिसत आहेत. अशातच अशोक खरात (Ashok Kharat) नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातून विधीसाठी वस्तू आणत होता, अशी चर्चा असल्याने विशेष तपास पथकाने मंगळवारी (दि. २४) इगतपुरी तालुक्यात धडक देत चौकशी केली. एसआयटीने इगतपुरी तालुक्यातील नांदगाव बुद्रुक गावी झाडाझडती घेतली आहे. गावातील एका व्यक्तीची चौकशी केल्याची सूत्रांची माहिती आहे. भोंदू अशोक खरात याच ठिकाणाहून काळी जादू आणि पूजा विधीसाठी लागणारे सामान आणत असल्याचा एसआयटीला संशय आहे. भोंदू अशोक खरातला (Ashok Kharat) गंडे-दोरे व अंगठ्या पुरवला गेल्याचा देखील संशय आहे. एसआयटीने घटनास्थळी जात सखोल चौकशी केली आहे.
इगतपुरी तालुक्यातील नांदगाव बुद्रुक येथे राहणाऱ्या एका स्थानिक बाबाच्या घरी अशोक खरात वारंवार येत जात असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. या दुव्याची शहानिशा करण्यासाठी तपास पथक गावात सखोल चौकशी केली आहे. तपासादरम्यान आणखी एक गंभीर बाब समोर आली आहे. स्थानिक भोंदूबाबामार्फत खरातला गंडे-दोरे, अंगठ्या यांसारख्या वस्तू पुरतल्या जात असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. खरातच्या आर्थिक व्यवहारांमधून या स्थानिक भोंदूबाबाच्या नावावर इगतपुरी तालुक्यातील विविध गावांमध्ये मालमत्ता खरेदी केल्याचा संशयही तपासात व्यक्त होत आहे. (Ashok Kharat)
मला साप, वाघ या विषयी काही माहिती नाही.
मी हे पहिल्यांदाच ऐकतो आहे.
मंदिरात कधीतरी जायचो. त्यावेळी 100 च्या आसपास लोक असायची.
शिवरात्र श्रावणी सोमवारी आशा वेळी जात होतो.
5 दिवसांच्या कोठडीत जे प्रश्न विचारले त्याची सगळी उत्तरं दिली.
अशोक खरातच्या शैक्षणिक वास्तव समोर आलं आहे. दहावी परीक्षेत गणितात नापास झाल्याची माहिती समोर आले आहे. गुणपत्रिकेनुसार एकूण २५१ गुण, टक्केवारी सुमारे ३५.८८% तर मराठीमध्ये 39 इंग्रजीत 37 गणितात 28 विज्ञानात 62 समाजशास्त्राचा 38 आणि हिंदीमध्ये 47 गुण मिळाले होते. नाव बदलून ‘अशोककुमार’ तर कॅप्टन उपाधी लावून जहाजावर अधिकारी बनण्याचे स्वप्न पूर्ण केले असण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. खरातचे खरे नाव लक्ष्मण असल्याचं समोर आलं आहे.सिन्नर तालुक्यातील कहांडळावडीमध्ये खरात वावी येथील माध्यमिक शाळेचा विद्यार्थी आहे. अंकशास्त्र शिकवणारा व्यक्ती स्वतःच गणितात अपयशी झाल्याचे दिसून आले आहे.(Ashok Kharat)
मिळालेल्या माहितीनुसार, अशोक खरात याचे मूळ गाव सिन्नर तालुक्यातील कहांडळवाडी (शिवाजीनगर) आहे. तो शिक्षणासाठी तेथून चार किलोमीटरवर असलेल्या वावी येथील माध्यमिक शाळेत जात होता. १ जून १९६५ ची जन्मतारीख असलेल्या अशोक खरात याचे शाळेत नाव 'लक्ष्मण एकनाथ खरात' असे होते. या लक्ष्मण नावाने त्याने मार्च १९८३ मध्ये दहावीच्या बोर्डाची परीक्षा बैठक क्र. सी-५२३४१ या आसन क्रमांकाने दिली. त्यात खरात दोन विषयांत नापास झाल्याचे दिसून येते. खरात याला मराठी विषयात ३९, इंग्रजी ३७, गणित २८, विज्ञान ६२, समाजशास्त्र ३८, हिंदी ४७, असे एकूण २५१ गुण मिळाले होते. तर टक्केवारी जेमतेम ३५.८६ होती.(Ashok Kharat)