Model Harshil Kalia Dies Road Accident: एका भीषण अपघातात (Tragic Jaipur Car Crash) सुप्रसिद्ध मॉडलचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जयपूरमध्ये (Jaipur Accident) घडलेल्या एका भीषण अपघातामुळे अख्खा देश हादरला आहे. सोमवारी रात्री उशिरा 'शिप्रा पथ रोड'वर घडलेल्या भीषण अपघातात 30 वर्षांची प्रसिद्ध मॉडेल हर्षिल कालिया (Model Harshil Kalia) हिचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अपघात एवढा भीषण होता की, मॉडलची कार नियंत्रणाबाहेर गेली आणि थेट जाऊन डिव्हायडरवर जाऊन आदळली आणि त्यानंतर उलटली. गाडीचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे. अपघाताची संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये (Model Harshil Kalia Accident CCTV Footage) कैद झाली आहे. या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज सध्या समोर आलं आहे. CCTV फुटेजचा हा व्हिडीओ पाहून अंगावर शहारे आल्याशिवाय राहणार नाहीत.
मीडिया रिपोर्टनुसार, हर्षिल कालिया (Harshil Kalia) रात्री उशिरा कामावरुन आपल्या घरी परतत होती. ज्यावेळी ती 'शिप्रा पथ रोड'वर पोहोचली, त्यावेळी अचानक तिचं कारवरचं नियंत्रण सुटलं आणि अवघ्या काही सेकंदातच होत्याचं नव्हतं झालं. मॉडेलची कार सर्वात आधी डिव्हायडरवर जाऊन आदळली आणि त्यानंतर उलटली. या अपघातामुळे घटनास्थळी एकच गोंधळ उडालेला.
घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांनी तात्काळ गाडीच्या दिशेनं धाव घेतली आणि पलटी झालेली गाडी सरळ केली. कारमध्ये मॉडेल हर्षिला गंभीर जखमी अवस्थेत होती. सर्वात आधी सर्वांनी मिळून तिला बाहेर काढलं आणि तात्काळ जवळच्या एका खासगी रुग्णालयात दाखल केलं. हर्षिलाच्या डोक्याला गंभीर दुखापत झालेली. पण, रुग्णालयात पोहोचताच डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलेलं. दरम्यान, मृत हर्षिल यानं 'Crime Next Door' या वेब सीरिजमध्ये काम केलेलं.
हर्षिल कालिया ही सुप्रसिद्ध मॉडल आहे. याव्यतिरिक्त, ती अनेक राजस्थानी म्युझिक व्हिडीओमध्ये मुख्य भूमिकेत झळकली होती. अगदी अलिकडच्या काळात ती मॉडेलिंग क्षेत्रात सक्रिय होती आणि सोशल मीडियावर तिचा मोठा चाहतावर्ग आहे.
हर्षिलाच्या अपघाताची माहिती मिळताच तात्काळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघाताचा तपास सुरू करण्यात आला. अपघाताचं नेमकं कारण शोधून काढण्यासाठी पोलीस सध्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करत आहेत. दरम्यान, अपघाताचं खरं कारण प्राथमिक कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.