अनेकदा घरात काही कारण नसताना पती-पत्नीमध्ये वाद होतो. वादाचं रुपांतर भांडणात होतं. जर वर्षातून कधीतरी भांडणं होत असतील तर ही सामान्य परिस्थिती आहे. मात्र अनेक घरात दररोज पती-पत्नीमध्ये भांडणं सुरू असतात. अगदी शुल्लक कारणांवरून देखील भांडणं होतात. रोजच्या भांडणामुळे परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाते याचा परिणाम म्हणजे घटस्फोट देखील होऊ शकतो. तसेच आई-वडील जर दररोज भांडत असतील तर त्याचा परिणाम हा त्या घरातील मुलांच्या मनावर देखील होतो. भांडणामुळे आई-वडिलांचं मुलांकडे दुर्लक्ष होतं. परिणामी मुलांचा मानसिक विकास हवा तसा होत नाही. मुलं देखील सतत चिडचिड करतात. त्यामुळे अशी भांडणं टाळली पाहिजेत. भांडणाचं नेमकं कारण लक्षात घेतलं पाहिजे. वास्तुशास्त्रानुसार जेव्हा तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा तयार होते, तेव्हा असे प्रसंग तुमच्या आयुष्यात येऊ शकतात. वास्तुशास्त्रात यावर काही सोपे उपाय सांगण्यात आले आहेत. त्याबद्दल आज आपण माहिती जाणून घेणार आहोत.
वास्तुशास्त्रानुसार तुमच्या घरात जेव्हा नकारात्मक ऊर्जा निर्माण होते, तेव्हा त्याचा परिणाम हा एकटा तुमच्यावरच होत नाही, तर तो तुमच्या संपूर्ण कुटुंबावर देखील होतो. त्यामुळे घरात ऊर्जा संतुलन महत्त्वाचं असतं. जेव्हा तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते, तेव्हा घरावर अचानक एखादं मोठं आर्थिक संकट येणं, व्यवसायामध्ये तोटा होणं, एवढंच नाही तर काहीही कारण नसताना घरातील सदस्यांसोबत विनाकारण वाद होणं अशा प्रकारची लक्षणं दिसू लागतात. जर घरात पती-पत्नीचे सतत भांडणं होत असतील तर त्यावर वास्तुशास्त्रामध्ये एक सोपा उपाय सांगण्यात आला आहे.
जर पती -पत्नीमध्ये सतत भांडणं होत असतील तर अशावेळी दोन कोऱ्या कागदांवर प्रत्येकी सात लवंगा, सात विलायची, एक लमालपत्र घ्या. या सर्वांची व्यवस्थित पुडी बांधा. यातील एक पुडी ही पतीच्या उशिखाली ठेवा, आणि एक पुडी पत्नीच्या उशिखाली ठेवावी. एक गोष्ट लक्षात ठेवा, ही पुडी सात दिवस त्या ठिकाणावरून हालवू नका. त्यानंतर आठव्या दिवशी या दोन्ही पुड्या जाळून टाका. सर्व प्रकारचा वास्तुदोष नाहीसा होईल, असं वास्तुशास्त्रात म्हटलं आहे. या उपायामुळे पती-पत्नीमधील भांडणं कमी होऊन घरात शांतता राहील असा दावा वास्तुशास्त्रात करण्यात आला आहे.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)