अमरावतीत भरधाव रुग्णवाहिकेची कारला जोराची धडक, आठ वर्षीय मुलीचा जागीच मृत्यू, आई वडील गंभीर जखमी
प्रणय निर्बाण, एबीपी माझा March 26, 2026 02:13 AM

Amravati Accident : अमरावतीत भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. भरधाव रुग्णवाहिकेनं एका कारला जोराची धडक दिली. या भीषण अपघातात पोलिस उपनिरीक्षक राहुल वानखडे यांच्यासह पत्नी जखमी झाली तर यामध्ये त्यांच्या आठ वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्रिशा वानखडे असं त्यांच्या मुलीचं नाव होतं. अमरावती जिल्ह्यातील देवगाव चौफुलीवरील ही धक्कादायक घटना घडली आहे. अपघाताचा CCTV समोर आला आहे. 

भरधाव रुग्णवाहिकेने धामणगाव रेल्वे तालुक्यातील देवगाव चौफुलीवर कारला जोरदार धडक दिली

भरधाव रुग्णवाहिकेने धामणगाव रेल्वे तालुक्यातील देवगाव चौफुलीवर कारला जोरदार धडक दिल्याने मोठा अपघात घडल्याची घटना घडला. या भीषण अपघातात एका आठ वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती माहिती मिळाली आहे. या घटनेची थरारक दृश्य सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहेत. 
तळेगाव दशासर पोलिस ठाण्यातील पोलीस उप निरीक्षक राहुल वानखडे हे आपल्या पत्नी आणि 8 वर्षीय मुलीसह तळेगाव येथे खासगी चारचाकी वाहनाने जात असताना देवगाव चौफुलीवर धामणगाव वरून यवतमाळकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या अँब्युलन्स वाहनने कारला जोरदार धडक दिली. धडक एवढी जोरदार होती कि, त्यामध्ये पो. उप निरीक्षक राहुल वानखडे यांची कार चकणाचुर झाली असून त्यामध्ये त्यांची 8 वर्षीय मुलगी त्रिशा राहुल वानखडे हिचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर त्यांच्या पत्नी आणि ते स्वतः गंभीर जखमी असून त्यांच्यावर यवतमाळ येथे उपचार सुरु आहेत. तर रुग्णवाहिकेमध्ये कोणताही रुग्ण नसताना चालक भरधाव वेगाने गाडी चालवीत असल्याची प्राथमिक माहिती आहे. रुग्णवाहिका चालकाला  पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

मुलीचा वर्गात प्रथम क्रमांक आल्याने आई वडील पेढे वाटण्यासाठी शाळेत गेले होते, परत येताना मुलीवर काळाचा घाला

8 वर्षीय मृतक त्रिशा वानखडे ही धामणगाव रेल्वे येथील एस ओ एस शाळेत येथे तिसऱ्या वर्गात शिकत होती. तिचा वर्गात प्रथम क्रमांक आल्याने त्या आनंदात पोलीस उपनिरीक्षक राहुल वानखडे हे आपल्या पत्नीसह शाळेत पेढे वाटण्याकरिता गेले होते. दरम्यान परत येत असताना देवगाव येथील पेट्रोलपंपवर पेट्रोल भरून परत तळेगाव दशासर येथे जातांना मोठी दुर्दैवी घटना घडली आहे.

सांगलीहून सिंधुदुर्ग जिल्ह्यात डिझेल आणि पेट्रोलची वाहतूक करणाऱ्या टँकरचा अपघात

सांगलीहून सिंधुदुर्ग जिल्ह्यात डिझेल आणि पेट्रोलची वाहतूक करणारा टँकर करूळ घाटात ब्रेक फेल झाल्यामुळे अपघात झाला. करूळ घाटात टँकर एका धोकादायक वळणावर डोंगराकडील बाजूला उलटला. या अपघातात टँकर चालक किरकोळ जखमी झाला असला तरी टँकरचे मात्र मोठे नुकसान झाले आहे. टँकरमध्ये ६ हजार लिटर पेट्रोल आणि ४ हजार लिटर डिझेल होते. टँकर पलटी झाल्यामुळे मोठ्या प्रमाणावर इंधन रस्त्यावरून वाहून गेले. या घटनेमुळे करूळ घाटातील वाहतूक रात्री उशिरापर्यंत पूर्णपणे ठप्प झाली. आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेने तातडीने उपाययोज केल्या असून वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

Model Harshil Kalia Dies Road Accident: भरधाव वेगातील कार डिव्हायडरवर आपटून रस्त्यावर उलटी पडली, प्रसिद्ध अभिनेत्रीचा भीषण अपघात, जागेवरच प्राण सोडला

 

 

 

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.