10 कोटींची पोटगी, एक घर आणि महिन्याचा खर्च; 'या' अटीशर्थींवरच घटस्फोट देणार सुपरस्टारची पत्नी
एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क March 26, 2026 09:43 AM

Pawan Singh Jyoti Singh Divorce Case: भोजपुरी सिनेसृष्टीतील (Bhojpuri Film Industry) 'पॉवर स्टार' पवन सिंह (Pawan Singh) आणि त्यांची पत्नी ज्योती सिंह (Jyoti Singh) यांच्या घटस्फोटाच्या जोरदार चर्चा रंगल्या आहेत. या खटल्यात एक महत्त्वाची सुनावणी पार पडली. या सुनावणीदरम्यान, पवन सिंह (Pawan Singh Jyoti Singh Divorce Case) यांनी न्यायमूर्ती आशुतोष कुमार यांच्यासमोर बोलताना स्पष्ट सांगितलेलं की, त्यांना आता ज्योती सिंह यांच्यासोबत राहायचं नाही आणि त्यांना घटस्फोट हवाय. याशिवाय, हा वाद परस्पर संमतीनं मिटावा या उद्देशानं, 'वन-टाइम सेटलमेंट'साठीही तयार असल्याची माहितीही पवन सिंह यांनी न्यायालयाला दिली. 

पवन सिंह आणि ज्योती सिंह यांच्या घटस्फोटाच्या खटल्याची सुनावणी बुधवार, 25 मार्च रोजी पार पडली. पवन सिंह दुपारी साधारण 2:20 वाजता न्यायालयाच्या कक्षात दाखल झाले. मात्र, पवन सिंह यांची पत्नी ज्योती सिंह आज न्यायालयात उपस्थित राहिल्या नाहीत. साधारण 35 ते 40 मिनिटांनंतर जेव्हा पवन सिंह न्यायालयातून बाहेर पडले, तेव्हा ते हताश दिसून आले. मीडिया रिपोर्टनुसार, पवन सिंह यांची पत्नी ज्योती सिंह यांनीही आज न्यायालयात उपस्थित राहणं अपेक्षित होतं, मात्र त्यांच्या अनुपस्थितीचं कारण अद्याप अस्पष्टच आहे.

भोजपुरी सुपरस्टार पवन सिंह सध्या त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहेत. सध्या त्यांचा पत्नी ज्योती सिंह यांच्याशी घटस्फोटाचा खटला सुरू आहे. या खटल्याच्या संदर्भात पवन सिंह बुधवारी आरा येथील दिवाणी न्यायालयात (Civil Court) उपस्थित राहिले. मात्र, त्यांच्या पत्नी ज्योती या न्यायालयात उपस्थित राहिल्या नाहीत.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Pawan Singh (@singhpawan999)

सुपरस्टारला घटस्फोट 'या' अटीशर्थींवरच देणार

ज्योती सिंह यांचे वकील विष्णूधर पांडे यांनी, ज्योती सिंह यांनी घटस्फोटासाठी ठेवलेल्या अटी स्पष्ट केल्या. त्यांनी सांगितलं की, जर पवन सिंह यांना ज्योती सिंह यांच्यासोबत राहायचं नसेल, तर त्यांना पोटगी म्हणून 10 कोटी रुपये द्यावे लागतील. याव्यतिरिक्त, त्यांना राहण्यासाठी एक घरही उपलब्ध करून द्यावं लागेल. तसेच, हा खटला प्रलंबित असेपर्यंत त्यांना दरमहा उदरनिर्वाहासाठी भत्ता (Maintenance Allowance) देणंही बंधनकारक असेल.

दरम्यान, ज्योती सिंह या यापूर्वी 11 फेब्रुवारी रोजी न्यायालयात उपस्थित राहिल्या होत्या. त्या वेळी त्या साडी परिधान करून आल्या होत्या आणि त्यांनी आपल्या भांगात कुंकूही लावलं होतं. मात्र, त्या दिवशी पवन सिंह न्यायालयात उपस्थित राहिले नव्हते.

भोजपुरी सुपरस्टार पवन सिंह यांची मागणी काय? 

भोजपुरी सुपरस्टार पवन सिंह यांचे वकील सुमन कुमार यांनी सांगितलं की, पवन सिंह यांनी न्यायालयाला कळवलंय की, त्यांना ज्योती सिंह यांच्यासोबत राहायचं नाही. त्यांनी ठामपणे सांगितलं की, ज्योती सिंह यांच्यासोबत पुढे राहणं त्यांना शक्य नाही. पवन सिंह यांनी वन टाईम सेटलमेंटसाठी ज्या काही अटी ठरतील, त्या मान्य करण्याची आपली तयारीही दर्शवली. दरम्यान, ज्योती सिंह न्यायालयात उपस्थित न राहिल्यामुळे, या विषयावर चर्चा होऊ शकली नाही. जर पुढील नियोजित तारखेला दोन्ही पक्ष उपस्थित राहिले, तर एकवेळच्या समझोत्याबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. पवन सिंह यांनी अद्याप आपण काय देऊ इच्छितो, हे स्पष्ट केलेलं नाही; न्यायालय सर्वप्रथम या प्रकरणावर ज्योती सिंह यांची बाजू ऐकून घेईल.

ज्योती सिंह या पवन सिंह यांच्या दुसऱ्या पत्नी आहेत. त्यांची पहिली पत्नी नीलम सिंह होती, जिनं 2015 मध्ये आत्महत्या केली होती. त्यानंतर, 7 मार्च 2018 रोजी पवन सिंह यांनी ज्योती सिंह यांच्याशी विवाह केला. त्यांच्या लग्नाची बरीच चर्चा झाली होती. मात्र, सध्या त्यांच्या नातेसंबंधात मोठा तणाव निर्माण झाला आहे.

पवन सिंह यांचं नेटवर्थ किती?

पवन सिंग हे भोजपुरी मनोरंजन क्षेत्रातील एक मोठे स्टार आहेत. त्यांची गाणी आणि सिनेमे अनेकदा प्रचंड गाजतात. ते अगदी लग्झरी लाईफस्टाईल जगतात. मीडिया रिपोर्टनुसार, पवन सिंह यांच्याकडे 16.75 कोटी रुपयांची मालमत्ता आहे. त्यांची जंगम मालमत्ता 5.04 कोटी रुपये इतकी आहे, तर त्यांच्या स्थावर मालमत्तेचं (immovable assets) मूल्य 11.70 कोटी रुपये आहे. ते एका सिनेमासाठी 40 लाख ते 50 लाख रुपयांचं मानधन घेतात. पवन सिंग यांनी 'स्त्री 2' (Stree 2) या सिनेमासाठी "खेतां बुलाया आई नहीं..." हे गाणं गायलं होतं. हे गाणे प्रचंड लोकप्रिय ठरलेलं.

Director Priyadarshan And Ex Wife Lissy Living Together: कधीकाळी अहंकारानं मोडला संसार, आता जिच्यासोबत घटस्फोट घेतला, तिच्यासोबतच 10 वर्षांनंतर एकत्र राहतोय बॉलिवूड दिग्दर्शक; नात्याबाबत म्हणाला...

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.