मुंबई: ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचा लाभ घेणाऱ्या राज्यातील लाखो महिलांसाठी दिलासादायक बातमी आहे. तांत्रिक चुकांमुळे ज्या महिलांना मिळणारा लाभ थांबला होता, त्यांना आपल्या अर्जात सुधारणा करण्यासाठी आता ३१ मार्च २०२६ पर्यंतची शेवटची संधी देण्यात आली आहे. राज्य शासनाच्या या निर्णयामुळे लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यांपासून वंचित असलेल्या हजारो लाभार्थी महिलांना मोठा आधार मिळाला आहे.(ladki bahin yojana)
योजनेच्या सुरुवातीला अर्ज भरताना झालेल्या घाईगडबडीमुळे अनेक महिलांनी ई-केवायसी (e-KYC) प्रक्रियेत चुकीचे पर्याय निवडले होते. विशेषतः ‘नाही’ ऐवजी ‘हो’ अशा तांत्रिक निवडीमुळे प्रणालीने अनेक पात्र अर्ज नाकारले होते. या तांत्रिक त्रुटी दूर करून माहिती अद्ययावत करण्यासाठी प्रशासनाने ही अंतिम मुदतवाढ दिली आहे.(ladki bahin yojana)
ज्यांचे अर्ज मंजूर आहेत, पण खात्यात एकही रुपया जमा झालेला नाही.ज्यांच्या बँक खात्याच्या माहितीत त्रुटी आहेत. ज्यांनी अद्याप आधार कार्डचे प्रमाणीकरण (Aadhaar Authentication) पूर्ण केलेले नाही. ज्यांचे बँक खाते डीबीटी (DBT) साठी लिंक किंवा सक्रिय नाही अशा लाभार्थी महिलांना अर्ज दुरुस्तीची संधी मिळणार आहे.
अनेक महिलांच्या आधार कार्डवरील नाव आणि बँक पासबुकवरील नाव यात तफावत असल्याने त्यांचे हप्ते रखडले होते. आता ३१ मार्चपर्यंत ही दुरुस्ती केल्यास, रखडलेल्या थकीत हप्त्यांसह पुढील सर्व लाभ महिलांच्या खात्यात जमा होणार आहेत.
जिल्हा प्रशासनाकडून सर्व पात्र लाभार्थी महिलांना आवाहन करण्यात आले आहे की, त्यांनी दिलेल्या मुदतीत आपली ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी. ३१ मार्च २०२६ नंतर कोणत्याही प्रकारची मुदतवाढ दिली जाणार नाही, त्यामुळे तांत्रिक कारणास्तव लाभ बंद झालेल्या महिलांनी तातडीने आपली माहिती अपडेट करावी.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिला व बाल विकास विभागाकडून चालवली जाते. या योजनेतून दरमहा महिलांच्या खात्यात 1500 रुपये जमा केले जातात. जानेवारी महिन्याचा हप्ता 23 फेब्रुवारीला वितरित करण्यात आला होता. आता फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कधी मिळणार याकडे राज्यातील महिलांचं लक्ष लागलं होतं. सामाजिक न्याय विभागाकडून 277 कोटी रुपयांचा निधी वितरीत करण्यात आल्यानं येत्या काही दिवसांमध्ये फेब्रुवारीच्या हप्त्याची रक्कम लाडक्या बहिणींना दिला जाऊ शकते.
आणखी वाचा