'कोकण हार्टेड गर्ल'नं दिली गूड न्यूज; आमिर खानसोबत मोठ्या प्रोजेक्टसाठी करणार काम, पोस्ट करत म्हणाली...
एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क March 27, 2026 12:43 PM

Ankita Walawalkar Work With Amir Khan: लोकप्रिय मराठी सोशल मीडिया इन्फ्लुएंसर (Social Media Influencer) आणि कंटेंट क्रिएटर 'कोकण हार्टेड गर्ल' (Kokan Hearted Girl) म्हणजेच, अंकिता वालावलकर (Ankita Walawalkar) तिच्या व्लॉग्समुळे चर्चेत असते. इंस्टाग्रामसारख्या प्लॅटफॉर्मवर ती फॅशन, ट्रॅव्हल, डेली लाइफ आणि रिलेटेबल कंटेंट शेअर करत असते. 'बिग बॉस मराठी'च्या (Bigg Boss Marathi) पाचव्या पर्वात अंकिता स्पर्धक म्हणून सहभागी झालेली. काही दिवसांपूर्वीच तिनं सोशल मीडियावर पोस्ट करुन तिनं तिचं ड्रीम होम घेतल्याची गूड न्यूज शेअर केलेली. अशातच आता महिन्याभराच्या आतच अंकिता वालावलकरनं आणखी एक गूड न्यूज चाहत्यांसोबत शेअर केली आहे. 

'कोकण हार्टेड गर्ल' अंकिता वालावलकरनं तिच्या सोशल मीडिया हँडल्सवर बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट आमिर खानसोबतचा (Amir Khan) फोटो पोस्ट केला आहे. तसेच, तिनं आमिर खानसोबतच्या भेटीचे फोटो आणि व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलेत. अंकिताची पोस्ट पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. काहींना तर दोघांच्या भेटीमुळे खूप प्रश्न पडले आहेत. अंकिता वालावलकरनं आमिर खानची भेट नेमकी का घेतली? हा प्रश्न अनेकांना पडला आहे. तर, अनेकांनी तिच्या पोस्टवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.  

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Ankita PrabhuWalawalkar (@kokanheartedgirl)

अंकिता वालावलकर आमिर खानला का भेटली? (Ankita Walawalkar Met Amir Khan)

'कोकण हार्टेड गर्ल' अंकिता वालावलकरनं आमिरसोबतचे फोटो शेअर करताना लिहिलं, "आमिर खान यांच्या विचारांमध्ये असलेली स्पष्टता आणि समाजासाठी काहीतरी अर्थपूर्ण करण्याची त्यांची जिद्द मनाला खूप भावली. आता त्यांच्या Paani Foundation @pani_foundation_india सोबत मिळून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी काम करण्याची संधी मला मिळत आहे, ही माझ्यासाठी मोठी जबाबदारी आणि अभिमानाची बाब आहे. कोकण हा निसर्गाने नटलेला प्रदेश असला तरी, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याची गरज इथेही तितकीच महत्त्वाची आहे. अशा वेळी पाणी फाउंडेशनसारख्या उपक्रमाचे कोकणात प्रथमच आगमन होणे, ही अत्यंत आनंदाची आणि सकारात्मक सुरुवात आहे."

"या उपक्रमाच्या माध्यमातून आपण अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचून, त्यांना सक्षम बनवण्याचा नक्कीच प्रयत्न करू. कोकणातून सुरू झालेली ही वाटचाल महाराष्ट्रभर नवी ऊर्जा आणि आशा निर्माण करेल, असा मला विश्वास आहे...", असं अंकितानं पुढे लिहिलंय. 

दरम्यान, आमीर खान (Aamir Khan) आणि किरण राव (Kiran Rao) यांनी 2016 साली पाणी फाउंडेशनची (Paani Foundation) स्थापना केली होती. ही संस्था महाराष्ट्रात पाणीटंचाईवर मात करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर काम करते. सत्यमेव जयते वॉटर कप (Satyamev Jayate Water Cup) या स्पर्धेच्या माध्यमातून गावागावांत जलसंधारण, जलव्यवस्थापन आणि श्रमदानाची चळवळ उभी करण्यात आली आहे. या उपक्रमामुळे अनेक दुष्काळग्रस्त गावांनी स्वतःच्या प्रयत्नातून पाण्याची समस्या कमी केली असून लोकांमध्ये पाण्याबाबत जागरूकता निर्माण झाली आहे. 

 

'खरं बोललं तर यांना टोचेल..' लग्नात न आलेल्या 'जवळच्या' लोकांविषयी पहिल्यांदाच बोलला सुरज चव्हाण; म्हणाला..

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.