Mumbai : बॉयफ्रेंडने मैत्रिणीच्या केसांची स्तुती केली, संतापलेल्या गर्लफ्रेंडने कैची घेतली अन्...; मुंबईतील धक्कादायक प्रकार
Saam TV March 27, 2026 02:45 PM
  • वर्सोव्यात जळफळाटातून तरुणीचे केस कापले

  • प्रियकराच्या स्तुतीमुळे घडली घटना

  • पोलिसांत गुन्हा दाखल

  • मुलुंडनंतर मुंबईत पुन्हा हिंसक प्रकार

मुंबईतील मुलुंडमध्ये एका मुलाने त्याची मैत्रीण त्याच्याशी बोलत नाही म्हणून तिच्यावर कोयत्याने हल्ला केल्याची घटना ताजी असताना, आता मुंबईतील वर्सोवा मधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्रियकराने मैत्रिणीची स्तुती केल्याने त्याच्या प्रेयसीने संबंधित तरुणीचे केस कापल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंबईतील वर्सोवा येथे ही घटना घडली आहे. २० वर्षीय सुहानीच्या (बदलेलं नाव) तक्रारीनुसार, सुहानी ही आरोपी तरुणीच्या प्रियकराची मैत्रीण होती. आरोपी तरुणीच्या प्रियकराने सुहानीच्या केसांची स्तुती केल्याने, त्याची प्रेयसी अस्वस्थ झाली होती. आरोपी तरुणीला तिचा प्रियकर आणि सुहानीमध्ये जवळीक वाढत असल्याचा संशय आला होता.

Shocking : २ अल्पवयीन मुलींवर बलात्कार, आईच्या लिव्ह-इन पार्टनरचं भयंकर कृत्य, पीडिता गरोदर राहिली

तसेच केसांची स्तुती केल्याने तिच्या मनात तो राग खदखदत होता. या रागातून तरुणीने मंगळवारी २५ मार्च रोजी मध्यरात्री १२.३० वाजताच्या सुमारास दोघी मैत्रिणींसह सुहानीच्या घरी गेली. या तिघींनी सुहानीला घराबाहेर खेचत कात्रीने तिचे केस कापले. या प्रसंगाचा मोबाइलद्वारे व्हिडीओही रेकॉर्ड केला. त्यानंतर तिघी घटनास्थळावरून पसार झाल्या. सुहानीच्या तक्रारीवरून वर्सोवा पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Ashok Kharat : महिलांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या अशोक खरातची करण्यात आली HIV टेस्ट, काय आला रिपोर्ट? मुलुंडमध्ये नेमकं काय घडलं?

मुलुंडमध्ये आशिष गौतम बनसोड या तरुणाने पीडित मुलगी त्याच्याशी बोलत नाही म्हणून तिच्या गळ्यावर कोयत्याने वार करीत तिच्या मित्रावर ही वार केल्याची घटना मंगळवारी घडली. पीडित १६ वर्षीय मुलगी आणि आरोपी हे बदलापूर चे रहिवासी असून एकमेकांना ओळखतात.मात्र आरोपी आशिषशी या तरुणीने बोलणे बंद केल्याने काल त्याने तिच्या कॉलेज जवळ तिला गाठले आणि सोबत आणलेल्या कोयत्याने तिला आणि तिच्या मित्राला गंभीर जखमी करीत जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी मुलुंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच मुलुंड पोलिसानी आरोपीला कोयत्यासह अटक केली आहे.आरोपी आशिषवर या अगोदर ही बदलापूरमध्ये विविध गुन्हे दाखल आहेत.या गुन्ह्याचा तपास मुलुंड पोलीस करीत आहेत.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.