नाशिकमध्ये चर्चेत असलेल्या भोंदू अशोक खरात प्रकरणात रोज नवे धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. तपासात आता त्याची लोकांना फसवण्याची अत्यंत चलाख पद्धत उघड झाली आहे. अशोक खरात ग्राहकांची वैयक्तिक माहिती मिळवण्यासाठी स्वतंत्र दोन टीमचा वापर करत होता. या टीमकडून तो आधीच व्यक्तीच्या नातेवाईकांकडून, ओळखीच्या लोकांकडून किंवा रेफरन्सद्वारे माहिती गोळा करून ठेवत असे.
अचूक माहिती सांगून त्यांचा विश्वास जिंकत असेयानंतर भेटीच्या पहिल्या पाच मिनिटांतच तो समोरच्या व्यक्तीबद्दल अचूक माहिती सांगून त्यांचा विश्वास जिंकत असे. यासाठी तो ‘हॉट रीडिंग’ आणि ‘कोल्ड रीडिंग’ या मानसशास्त्रीय तंत्रांचा वापर करत होता. हॉट रीडिंगमध्ये आधीच मिळवलेली माहिती वापरली जात असे, तर कोल्ड रीडिंगमध्ये सामान्य प्रश्न विचारून व्यक्तीच्या प्रतिक्रियांवरून अंदाज बांधत तो समोरच्याला भ्रमित करत असे. फेस रीडिंग आणि बॉडी लँग्वेजचा वापर करून तो अनेकांना आपल्या जाळ्यात अडकवत असल्याचंही समोर आलं आहे.
अर्धांगवायूचा झटकादरम्यान, खरातच्या आरोग्याबाबतही धक्कादायक माहिती समोर आली आहे. दीड वर्षांपूर्वी त्याला अर्धांगवायूचा झटका आला होता. उत्तेजक औषधांच्या अतिसेवनामुळे त्याची प्रकृती बिघडली होती आणि शहरातील एका खासगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार करण्यात आले होते. एका डॉक्टर भक्ताने वेळीच उपचार केल्याने त्याचा जीव वाचल्याची माहिती आहे. आजही त्याच्या एका हाताची हालचाल मर्यादित असून चेहऱ्यावरही त्याचे परिणाम दिसत असल्याचे सांगितले जाते.
Ashok Kharat HIV Test Report Result : 150 महिलांचं लैंगिक शोषण करणाऱ्या अशोक खरातचा HIV रिपोर्ट आला समोर; चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह की निगेटिव्ह? महिलेचा व्हिडिओ व्हायरलया प्रकरणात आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे दोन उच्चपदस्थ महिला अधिकारीही त्याच्या जाळ्यात अडकल्याची माहिती समोर आली आहे. त्यांनी स्वतःसह इतरांनाही खरातकडे नेल्यामुळे आता त्या अडचणीत सापडल्या आहेत. एका महिलेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ती आज तक्रार दाखल करण्याच्या तयारीत असून एसआयटीशी संपर्क साधल्याची माहिती मिळते.
आर्थिक गैरव्यवहारदरम्यान, या प्रकरणाची व्याप्ती आता आर्थिक गैरव्यवहारांपर्यंत पोहोचली आहे. भोंदू अशोक खरात आता ईडी, फॉरेक्स आणि कस्टम विभागाच्या रडारवर आला आहे. कोट्यवधी रुपयांच्या व्यवहारांची कागदपत्रे ईडीकडे पाठवली जाण्याची तयारी सुरू आहे. त्याच्या २१ देशांच्या विदेश दौऱ्यांचा खर्च, विदेशी चलन व्यवहार आणि तुर्कस्थानसह विदेशातून आणलेल्या वस्तूंवर कस्टम ड्युटी भरली का, याचीही चौकशी सुरू आहे.
तब्बल ५२ मालमत्तांची माहिती समोरनाशिक आणि नगर परिसरात त्याच्या तब्बल ५२ मालमत्तांची माहिती समोर आली असून बनावट खडे, रत्न आणि मध विक्रीतून कमावलेल्या पैशाचाही तपास सुरू आहे. या सर्व प्रकरणामुळे अनेक केंद्रीय यंत्रणा सक्रिय झाल्या असून येत्या काही दिवसांत आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे.
Ashok Kharat: "मी कुणावरही जबरदस्ती केली नाही, माझ्या अंतर्मनाने..."; पोलीस कोठडीत अशोक खरातचं धक्कादायक विधान, तपासात नवे ट्विस्ट!