अशोक खरातचे व्हिडिओ नेमकं बाहेर कसे आले? पोलीस आयुक्तांनी सांगितलं व्हायरल ओपन सिक्रेट
एबीपी माझा वेब टीम March 28, 2026 12:13 AM

Police Commissioner Sandeep Karnik on Ashok Kharat Case :  नाशिकचा भोंदूबाबा  अशोक खरातचे एकामागून एक कारनामे समोर येत आहे. त्याने अनेक महिलांचे लैंगिक शोषण केले आहे. त्याचे 100 हून अधिक व्हिडिओ समोर आले आहेत. इतकेच नाही तर दमदाटी करुन, धमक्या देऊन त्याने मोक्याच्या जमिनीही लाटल्याची माहिती समोर येत आहे. त्याचे गोरखधंदे अजूनही बाहेर येत आहेत. तर या प्रकरणात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांची पहिली विकेट पडली आहे. दरम्यान, अशोक खरातच्या संपूर्ण प्रकरणावर नाशिकचे विद्यमान पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी माहिती दिली आहे. अशोक खरातचे व्हिडिओ नेमकं बाहेर कसे आले? याबाबतची माहिता पोलीस आयुक्तांनी दिली आहे. ते एबीपी माझाच्या कॉफी विथ कौशिक या कार्यक्रमात बोलत होते.

अशोक खरातचे व्हिडीओ कसे बाहेर आले?

अशोक खरातचे पोलिसांकडे जे व्हिडीओ आले त्यातील कही व्हिडीओ बाहेर गेला नसल्याची माहिती पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी दिली आहे. व्हिडीओचा प्रकार आह तो खऱातच्या ऑफीस बॉयने समोर आणले आहेत. ऑफिस बॉयच्या सात महिने प्रेग्नंट असणाऱ्या बायकोसोबत अश्लिल कृत्य केले. त्यानंतर ऑफिस बॉय खरातच्या विरोधात गेला होता. त्याने काही रेकॉर्ड केले. ते व्हिडीओ त्याने वेगवेगळ्या ठिकाणी ठेवले होते. माझ्या जीवाला काही बर वाईट झालं तर हे व्हिडीओ बाहेर आणावेत. ज्यांच्याकडे ऑफिस बॉयने व्हिडीओ ठेवले होते. त्यांनी देखील इतरांकड व्हिडीओ ठेवले होते. यातूनच हे व्हिडीओ बाहेर आले आहेत असे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक म्हणाले. 

ऑफिस बॉयने जीवाच्या भीतीने अशोक खराचे व्हिडीओ वेगवेगळ्या ठिकाणी ठेवले होते

ऑफिस बॉयने जीवाच्या भीतीने अशोक खराचे व्हिडीओ वेगवेगळ्या ठिकाणी ठेवले होते असे पोलीस आयुक्त म्हणाले. आम्ही 65 ट्वीटर आणि फेसबुकवर, इन्स्टावर गुन्हा दाखल केला आहे. काही व्हिडीओ मॉर्फ देखील केले आहेत, त्यांच्यावर देखील कारवाई करण्याचे काम सुरु असल्याचे पोलीस आयुक्त म्हणाले. बऱ्याच ठिकाणाहून अशोक खरातकडे लोक येत होते. महाराष्ट्रासह बाहेरच्या राज्यातून देखील येत होते. अशोक खरातच्या सगळ्या व्हिडीओंची संख्या खूप मोठी असल्याची माहिती पोलीस आयुक्तांनी दिली आहे. यामध्ये काही व्हिडीओ रिपीटेड देखील आहेत.  

Marathi Actor On Ashok Kharat Case: 'समोरच्याला भोंदू म्हणण्यापेक्षा....'; अशोक खरात प्रकरणावर 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'फेम अभिनेत्याची पोस्ट चर्चेत, म्हणाला...

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.