पंखा लावण्यावरून वाद; महाराष्ट्रातील मोठ्या विद्यापीठात तरुणीचं विद्यार्थिनीसोबत भयंकर कृत्य, पोलिसांवरही दबाव...
esakal March 28, 2026 01:45 AM

नागपूर : महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठातील चौथ्या वर्षातील विद्यार्थिनीने तिच्या खोलीत राहणाऱ्या तृतीय वर्षाच्या विद्यार्थिनीची रॅगींग केल्याची धक्कादायक माहिती समोर आली. त्यामुळे विद्यापीठात एकच खळबळ उडाली. याप्रकरणी विद्यापीठातील ॲन्टी रॅगींग समितीकडून बुटीबोरी पोलिसांना दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी विद्यार्थिनीवर गुन्हा दाखल केल्याची माहिती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विद्यापीठात बी.ए.-एलएल.बी. या अभ्यासक्रमातील चौथ्या वर्षात आणि तिसऱ्या वर्षात शिकणाऱ्या दोन विद्यार्थिनी वसतिगृहातील एकाच खोलीत वास्तव्यास होत्या. दरम्यान दोघीचेही एकमेकांशी पटत नसल्याने त्यांचे भांडण व्हायचे. काही दिवसांपूर्वी खोलीतील पंखा लावण्यावरून दोघींमध्ये वाद झाला. त्यातून सिनिअर असलेल्या विद्यार्थिनी तिच्या मैत्रिणीसह ज्युनिअर असलेल्या मुलीला त्रास दिला. त्यामुळे ज्युनिअर विद्यार्थिनीने ॲन्टी रॅगींग सेलकडे त्याबाबत तक्रार नोंदविली.

Kolhapur Crime : गुन्ह्यात घट झाली तरी, दुचाकी, चारचाकींची चोरी अन् जोरात गांजा तस्करी; दोन वर्षांतील चित्र नागरिक हैराण हिलांच्या सुरक्षेवर पोलिसांचा भर

तक्रार आल्यावर समितीद्वारे याबाबत दोन्ही मुलींची चौकशी करण्यास सुरुवात केली. चौकशीतून आलेल्या तथ्थ्यांच्या आधारे समितीकडून सिनिअर असलेल्या विद्यार्थिनीविरोधात विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नियमानुसार, तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार समितीकडून बुटीबोरी ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. त्यावरून पोलिसांनी विद्यार्थिनीविरोधात गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केला आहे.

Sangli : अल्पवयीन मुलीवर दबाव टाकून अत्याचार करत व्हिडिओ बनवला; तणावात येऊन उचललं टोकाचं पाऊल, प्रकरणातून धक्कादायक बाब समोर पोलिसांवर दबाव, माहिती देण्यास नकार

विधी विद्यापीठात अनेक नामवंत वकील आणि न्यायाधीश, न्यायमूर्तींची मुले शिकतात. त्यामुळे विद्यापीठात घडलेल्या रॅगींगच्या या प्रकरणाबाबत ग्रामीण पोलिसांकडून कमालीची गुप्तता पाळण्यात येत आहे. याप्रकरणी बुटीबोरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक चवरे यांचेशी संपर्क साधला असता, त्यांनी काहीही सांगण्यास थेट नकार दिला.

याशिवाय माहिती कक्षाकडून माहिती घेण्याचे सांगितले. यावेळी अतिरिक्त पोलिस अधीक्षक अनिल म्हस्के आणि पोलिस अधीक्षक डॉ. हर्ष पोद्दार यानांही संपर्क केला असता, त्यांनी प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे या प्रकरणात पोलिसांवर दबाव असल्याचे दिसून येत आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.